देवगडमधील समस्या तातडीने सोडवा

देवगडमधील समस्या तातडीने सोडवा
Published on

55511

देवगडमधील समस्या तातडीने सोडवा

ठाकरे शिवसेना : ‘पंतप्रधान आवास’, पाणीप्रश्‍नी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ : येथील देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध समस्यांकडे ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजना, घनकचरा व्यवस्थापन यांसह पाणी प्रश्‍नाच्या अनुषंगाने काही प्रश्‍न उपस्थित करीत आपल्या मागणीचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज कांबळे यांना देण्यात आले.
विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर येथील ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी श्री. कांबळे यांची भेट घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, माजी सभापती रेश्मा सावंत, नगरसेवक नितीन बांदेकर, प्रफुल्ल कणेरकर, दिनेश पारकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, देवगड जामसंडे नगरपंचायत मार्फत ज्यांना घर नाही अशा लोकांना पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली होती. यामध्ये सुरु केलेले बांधकाम गेली सुमारे तीन चार वर्ष बंद होते. त्याबाबत चौकशी केली असता, बांधकामाची पहाणी करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून २०२२ मध्ये खंडेलवाल समिती आली होती. या समितीने पहाणी करून आपला पहाणी अहवाल नगरपंचायतीकडे पाठवलेला आहे. संबधित केलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून संबधित बांधकाम पाडून नविन बांधकाम करण्याची, नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात यावा तसेच संबंधित ठेकेदाराला (जुन्या) सुमारे १५ लाख रुपये दंड ठोठावला असून इतर अनेक ताशेरे मारल्याचे समजते. असे असतानाही संबंधित ठेकेदाराने बांधकाम चालू केले आहे, याबाबत मुख्याधिकारी म्हणून काय कारवाई केली ते बांधकाम पाडणार आहात की नाही? नगरपंचायत मार्फत शहरातील नागरिकांकडून ओला व सुका कचरा घंटागाडी मार्फत संकलन केला जातो. त्याचा कर नगरपंचायत घेत आहे. परंतु, १ ते ६ मार्चपर्यंत कचरा संकलन बंद होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली याला जबाबदार कोण? या सर्वांची उत्तरे आठ दिवसांत न मिळाल्यास शहरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
.............
पाण्यासाठीचे नियोजन काय?
देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी शिरगाव पाडाघर व दहिबांव अन्नपूर्णा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात पाडाघर येथून पाणी येतच नाही. तसेच अन्नपूर्णा नदीवरून येणारी पाईप लाईन जीर्ण झाली असल्याने अनेक वेळा फुटत असते. साहजिकच ती दुरुस्त होईपर्यंत पाणी पुरवठा खंडित होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेतला? याची माहिती द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com