सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा १८ पासून

सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा १८ पासून
Published on

सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा १८ पासून

खासदार नारायण राणे : अन्य शहरांसाठी लवकरच सेवा

कणकवली, ता. ४ : परुळे - चिपी येथील विमानतळावरून १८ एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा दर शुक्रवारी सुरू होणार आहे. तसेच इंडिगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली.
अलीकडेच नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल, असे खासदार नारायण राणे यांना आश्वासित केले होते. गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग - पुणे विमान वाहतूक सुरूही झाली आहे. गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरू असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुन्‍हा मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खासदार राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्त्‍वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवासुविधा, समस्यांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवासुविधा अपडेट करण्यात येत आहेत.
‘आरसीएस’चा कालावधी तीन वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबविल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाईन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना त्‍याचा मोठा लाभ होत होता. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गसाठी ‘आरसीएस’ आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गसाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत स्पष्ट भूमिका खासदार राणे यांनी स्पष्ट केली आहे.
----
पुण्यासाठीही सेवा सुरू
१८ एप्रिलपासून मुंबई-चिपी-मुंबई ही एअर अलायन्सची विमानसेवा दर शुक्रवारी सुरू होणार आहे. तसेच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे. काही तांत्रिक त्रृटी दूर केल्यानंतर त्याची माहिती जाहीर होईल, असे खासदार राणे म्हणाले. पुणे-सिंधुदुर्ग-पुणे ही सेवा गेल्याच आठवड्यापासून सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com