खेडशी हायस्कूलचे तिघे गुणवत्ता यादीत

खेडशी हायस्कूलचे तिघे गुणवत्ता यादीत

Published on

खेडशी हायस्कूलचे
तिघे गुणवत्ता यादीत
रत्नागिरीः शहराजवळील खेडशी माध्यमिक शिक्षणसंस्थेच्या श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी मृण्मयी पानवलकर ही एनएमएमएस परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आली आहे. तिला दरवर्षी १२ हजार शिष्यवृत्ती चार वर्षे असे एकूण ४८ हजार हजार रुपये मिळणार आहे तसेच विद्यालयातील सारथी शिष्यवृत्तीसाठी निधी सावंतदेसाई व प्रिती चव्हाण या विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्या दोघींना दरवर्षी ९ हजार ६०० शिष्यवृत्ती असे चार वर्षे ३८ हजार ४०० प्रत्येकी मिळणार आहे.
---
काव्या सावंतदेसाई
राज्यात चौथी
रत्नागिरी ः इंडियन टॅलेंट सर्च (आयटीएसई) परीक्षा जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत शहरानजीकच्या खेडशी माध्यमिक शिक्षणसंस्थेचे श्री महालक्ष्मी प्राथमिक विद्यालयातील पहिलीतील विद्यार्थिनी काव्या सावंतदेसाई २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात चौथी आली आहे तसेच साई कदम याने २०० पैकी १९० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम तर सावी कदम २०० पैकी १८२ गुण मिळवून पाचवी आली आहे. या परीक्षेत पहिलीतील नील सावंतदेसाई व श्रेयस इरळे याने २०० पैकी १७२ गुण मिळवून खेडशी केंद्रामध्ये प्रथम तर आराध्या जोशीलकर २०० पैकी १७० गुण मिळवून तृतीय आली आहे तसेच भावेश सांडिम (इ. ६वी) मधून १९८ गुण मिळवून खेडशी केंद्रात प्रथम तर अभय भारती १९२ गुण मिळवून दुसरा आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com