

-rat२६p१७.jpg-
P२५N६००३२
रत्नागिरी : सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजचे पुरस्कार पद्मश्री डॉ. सी. आर. चंद्रशेखर यांच्या हस्ते स्वीकारताना फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद.
---
फिनोलेक्स अॅकॅडमीला दोन पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : होप फाउंडेशन, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला इंडिया इलाईट एज्युकेशन अँड इन्स्टिट्युशनल एक्सलन्स अॅवॉर्ड अँड कॉन्फरन्स २०२५ नॅशनल एडिशनमध्ये वेगवेगळ्या दोन पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यामध्ये महाविद्यालयाला भारतातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट अभियांत्रिकी संस्था हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाविद्यालय उत्कृष्ट प्लेसमेंट असलेली संस्था ठरले आहे.
हे पुरस्कार पद्मश्री डॉ. सी. आर. चंद्रशेखर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा समारंभ बेंगळूर येथील दी ताज वेस्ट एन्ड येथे झाला. या पुरस्कारच्या सर्वेक्षणासाठी मुख्यत्वे महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकव, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क, संशोधन अभिमुखता आणि नोकरीतील संधी या गोष्टींचा विचार करण्यात आला. या यशाबद्दल होप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अरूणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.