९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बसस्थानक पूर्णत्वास
-rat८p१२.jpg-
२५N६२५४९
रत्नागिरी : पत्रकार परिषदेत गुरूवारी माहिती देताना राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे.
-rat८p१३.jpg-
२५N६२५५०
रत्नागिरी : रत्नागिरीचे सुसज्ज, अद्ययावत मध्यवर्ती बसस्थानक.
------
(कॉमन इंट्रो आणि कॉमन हेडिंग लावून दोन्ही बातम्या शेजारी शेजारी घ्याव्यात)
रत्नागिरीचे बसस्थानक पूर्ण, चिपळूणचे काम रखडले
रत्नागिरीचे रविवारी लोकार्पण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी/चिपळूण, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेल्या निधीतून रत्नागिरी आणि चिपळूण येथील मुख्य एसटी बसस्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातील नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रत्नागिरीमधील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम रडतखडत सुरू आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. रखडलेल्या कामांना एसटी महामंडळाने गती द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
---
बसस्थानक ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास
रत्नागिरी, ता. ८ : जवळपास ९ वर्षे रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे आता पूर्णत्वास गेले आहे. यामुळे स्थानकापलीकडे रस्त्यावर थांबणाऱ्या प्रवाशांचा वनवास संपणार आहे. या स्थानकाचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. ११) सायंकाळी ५ वाजता राज्याचे परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी आज माळनाका येथील विभाग नियंत्रक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बसस्थानकासंबंधी माहिती दिली. मध्यवर्ती बसस्थानकाची पहिली इमारत १९५८ मधील होतील. स्थानकाचे पूर्वीचे क्षेत्रफळ १८५५ चौरस मीटर होते. आता बांधकाम क्षेत्रफळ ३५०४ चौरस मीटर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अद्ययावत असे हे बसस्थानक ठरेल, असा विश्वास विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी व्यक्त केला.
बोरसे यांनी सांगितले, पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानकाची ही देखणी आणि अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज वास्तू उभी राहिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार मध्यवर्ती बसस्थानक नूतनीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरणाचे काम एमआयडीसीने हाती घेतले. यासाठी १७.५० कोटी रुपये निधी मंजूर केला. जवळपास सव्वा वर्षात हे काम पूर्ण झाले आहे.
बसस्थानकाच्या तळमजल्यावर शहरी बसेसकरिता सहा फलाट व पहिल्या मजल्यावर ग्रामीण बसेसकरिता १४ फलाट आहेत. चालक व वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष बांधला आहे. ग्रामीणसाठी सहा वाणिज्य आस्थापना गाळे व शहरीसाठी १८ वाणिज्य गाळे असून, पुढील महिन्याभरात ऑनलाइन निविदा प्रक्रियेनंतर ते दिले जातील, असे बोरसे यांनी सांगितले.
---
असे आहे बसस्थानक
स्थानकप्रमुख कार्यालय, राज्य परिवहन महामंडळाची इतर कार्यालये, स्वतंत्र पोलिस नियंत्रण कक्ष व वाहतूक नियंत्रण कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता दोन उपहारगृह, बैठक व्यवस्था, प्रवासी प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा.
---
दोनवेळा भूमीपूजन
२०१६ मध्ये रत्नागिरी बसस्थानक बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वाने मंजूर करण्यात आले होते. या कामाचे भूमीपूजनदेखील झाले होते; मात्र, त्यानंतर सत्तांतर झाले. त्यानंतरच्या मंत्र्यांनी या बसस्थानकाचा वरील प्रस्ताव रद्द केला. नंतर नव्याने दहा लाखांचा आराखडा मंजूर केला. त्यात पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी बदल सुचवले. त्यानंतर भूमीपूजन करण्यात आले; मात्र अपुऱ्या निधीमुळे व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे काम रखडले. मग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी परिवहन महामंडळ व एमआयडीसीमध्ये सामंजस्य करार करून घेतला आणि मग सव्वा वर्षातच हे काम पूर्णत्वास गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.