अपरांत रत्न पुरस्कार संदीप पावसकर
-rat२७p९.jpg-
२५N६६५५१
रत्नागिरी : पहिला अपरांत रत्न पुरस्कार संदीप पावसकर यांना प्रदान करताना डॉ. किशोर सुखटणकर. सोबत प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, मदन भास्करे, डॉ. सीमा कदम.
-------
संदीप पावसकर यांना
‘अपरांत रत्न’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ११वी कला-१९९०चे माजी विद्यार्थी आयोजित संमेलनात पहिला अपरांत रत्न पुरस्कार कोकण पर्यटनाची मान उंचावणारे संदीप पावसकर आणि एनसीसीच्या पहिल्या महिला अधिकारी डॉ. सीमा कदम यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला.
पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पावसकर हे बॅचचे माजी विद्यार्थी. त्यांनी कोकणातील पर्यटनाच्या वाढीला हातभार लावला आहे. तोणदे गावामध्ये ते आपला व्यवसाय करतात. समाजमाध्यमावर ते प्रसिद्ध असून, अनेक पर्यटकांनी त्यांच्या कलेला उत्स्फूर्तपणे दाद दिली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या विनोदी शैलीत आपल्या पर्यटन कार्याची दखल घेऊन दिलेला ''अपरांत ग्रुप''चा पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. हा पुरस्कार आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहील, असे सांगितले.
सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा उदयोन्मुख अभिनेता शुभम शिवलकर याचा हृद्य सत्कार करण्यात आला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामध्ये प्रथमच मेजर रॅक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयातील प्रा. डॉ. सीमा कदम यांनाही गौरवण्यात आले. यानंतर माजी विद्यार्थ्यांची मुले वर्षा संजय शिंदे आणि योगिनी श्रीकांत मुळ्ये यांचा सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.