जिल्ह्यात ६० टक्के खरीप पेरण्या पूर्ण
- rat११p९.jpg-
२५N६९८२८
संगमेश्वर ः पेरणी केलेले भात रुजून आले आहे.
---
जिल्ह्यात ६० टक्के खरीप पेरण्या पूर्ण
शेतकऱ्यांची लगबग ; पावसाची काहीशी विश्रांती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व, मॉन्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांकडून नांगरणी, पेरण्याच्या कामास वेग आला आहे. कोणी बैलाद्वारे तर कोणी यांत्रिकाच्या सहाय्याने नांगरणी, पेरणी करत आहेत. आतापर्यंत २५४१. ७६ हेक्टर क्षेत्रावर एकूण ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या दापोली, चिपळूणमध्ये झाल्या आहेत. सर्वात कमी लांजा, गुहागर या तालुक्यात झाल्या आहेत.
रत्नागिरीसह राज्यात मॉन्सूनपूर्वीचा पाऊस आठ दिवसांपूर्वीच आला. पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले आतापर्यंत एवढा पाऊस झाला नाही एवढा विक्रमी पाऊस मे महिन्यात झाला आहे; मात्र मागील चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पुन्हा एकदा कडक उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण झाले आहेत तसेच दुसरीकडे पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कामे करण्यास गती दिली आहे. यात नाचणीच्या पेरण्यासाठी नांगरणी करण्यात येत आहे. काहीजण पारंपरिक पद्धतीने बैलाने नांगरणी, पेरणी करत आहेत. काहीजण यांत्रिकी मशिनचा वापर करून नांगरणी करत आहेत. आता लवकरच मृग नक्षत्राचा पाऊस पडणार असल्यामुळे खऱ्याअर्थाने बळीराजाकडून भातपेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने आता भातपेरणी कशी करावी, असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
तालुकानिहाय खरीपची आकडेवारी
तालुका* पेरणी क्षेत्र (हेक्टर)
चिपळूण* ४४४.७१
रत्नागिरी* २१०.६२
लांजा* २४२.२
राजापूर* २७८.२
संगमेश्वर* ३५४.२
गुहागर* १११.२३
खेड* २७३.२
दापोली* ४६२.२
मंडणगड* १६५.२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.