वैश्य समाजातर्फे २२ ला गुणगौरव

वैश्य समाजातर्फे २२ ला गुणगौरव
Published on

वैश्य समाजातर्फे
२२ ला गुणगौरव
सावंतवाडी ः वैश्य समाज सावंतवाडीतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम २२ जूनला सायंकाळी ५ वाजता माजी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कुडाळ माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई स्थित उपसचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर (मूळ रा. नारुळ, ता. कुडाळ) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक व बारावी परीक्षेत ७५ टक्के तसेच माध्यमिक, पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एमटीटीएस परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले आणि पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वैश्य जातीतील व इतर क्षेत्रात यश संपादन केलेल्या ज्ञातीबांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाची किंवा सर्टिफिकेटची छायांकित प्रत मोबाईल नंबरसह १६ जूनपर्यंत वैश्य भवन कार्यालय, गवळी तिठा, सावंतवाडी येथे आणून द्यावी, असे आवाहन वैश्य समाज सावंतवाडी अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
................
ऑनलाईन नोंदणी
करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी डी.एस.डब्ल्यू. पोर्टल किंवा संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. नोंदणी केल्यानंतर भरलेला फॉर्म जिल्हा सैनिक कायार्लय, सिंधुदुर्ग येथे जमा करून खात्री करावी. ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांचे ओळखपत्र खराब अथवा वापरण्यास योग्य नाही, त्यांना नवीन ओळखपत्र त्वरित दिले जाईल. उर्वरित नोंदणी केलेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना नवीन ओळखपत्र केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाल्यावर दिले जाईल. अधिक माहितीसाठी कायार्लयाशी संपर्क करावा.
.....................
सिंधुदुर्गनगरीत सोमवारी
महिला लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (ता. १६) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा, यादृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन घेतला जातो. महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करून घ्यावेत. समस्याग्रस्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com