भरणेत महाराजस्व अभियान
भरणेत महाराजस्व अभियान
खेड : भरणे येथे तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात भरणे मंडळातील शेतकरी खातेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. प्राथमिक स्वरुपात शेतकऱ्यांना दाखलेही वितरीत करण्यात आले. उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, पी. एम. किसान योजना, सातबारा वितरण, खाते उतारा वितरण, वारसा फेरफार वितरण, प्रतिज्ञापत्र वितरण दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी उपस्थित शेतकरी खातेदारांना मार्गदर्शन केले. मंडल अधिकारी उमाकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कृषी सहाय्यक आचलखांब यांनी सूत्रसंचालन, तर ग्राम महसूल अधिकारी विशाल चौगले यांनी आभार मानले.
''ज्ञानदीप''चे विद्यार्थी गायन-वादन स्पर्धेत चमकले
खेड : मुंबई येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयात घेण्यात आलेल्या गायन-वादन स्पर्धेत भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदीप विद्यामंदिरमधील २४ विद्यार्थी चमकले. हार्मोनिअम वादन प्रारंभिक परीक्षेत पहिलीतील गौरवी झोरे, दुसरीतील स्पृहा बेर्डे, अवनी चिले, तिसरीतील अजिंक्य भुले, ऋषिकेश कांदेकर, तर गायन प्रारंभिक परीक्षेत पहिलीतील परी मोरे, दुसरीतील अवनी सोमण, तिसरीतील मनस्वी दामले, आराध्या भोसले, शरण्या दळवी, अवनी आयरे, ईश्वरी हटकर यांनी यश प्राप्त केले. तबला वादन प्रवेशिका प्रथम परीक्षेत तिसरीतील हर्ष देशमुख, चौथीतील हिमांशू कुलकर्णी, पाचवीतील श्रीहर्ष वाघमोडे, शर्विल पाटणे, सातवीतील तन्मय जोशी, आस्था सकपाळ, सार्थक काणे, काव्या पेठे, आठवीतील अर्णव मगदूम, मयुरेश फागे, नववीतील निषाद शिंदे, अनुराग वाघमोडे, अकरावीतील शुभम मांगले यांनी यश मिळवले, विद्यार्थ्यांना चैतन्या गोडबोले, निळकंठ गोखले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, अध्यक्ष भालचंद्र कांबळे, प्राचार्य राजकुमार मगदूम, मुख्याध्यापिका पूर्वा मोरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.