शिक्षण संस्थांनी नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु करावेत
- rat१६p१०.jpg-
२५N७०८९७
साडवली -देवरूख येथील अधिवेशनात पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना पदाधिकारी.
---
शिक्षणसंस्थांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत
डॉ. उदय सामंत ः शिक्षणसंस्था महामंडळाचे ३६ अधिवेशन देवरूखमध्ये
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १६ : महाराष्ट्रातील शिक्षण हे जगातील आदर्शवत शिक्षण आहे. जगाच्या पाठीवर असे शिक्षण मिळू शकत नाही, अशी भावना शिक्षणसंस्था चालकांमध्ये असली पाहिजे. मुलांशी आपण बांधील आहोत, या भावनेतून भविष्यातील आधुनिक जगाला जर सामोरे जायचे असेल तर नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या संस्थांमधून सुरू केले पाहिजे. शासनाच्या सहकार्याने आपले विद्यार्थी परदेशात गेले पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे ३६व्या एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. हे अधिवेशन कोकण विभागात प्रथमच देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात झाले. या वेळी आमदार शेखर निकम, माजी मंत्री रवींद्र माने, संस्थाध्यक्ष आयोजक सदानंद भागवत, शिरीष फाटक, म. रा. शि. संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अशोक थोरात, सहकार्यवाह विजग गव्हाणे, सहकार्यवाह रवींद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात पहिली नवीन शिक्षणसंस्था काढण्याचे धाडस स्व. गोविंदराव निकम यांनी केले. ग्रामीण भागात अनेक शिक्षणसंस्था आहेत. त्यांच्या कामात पारदर्शकता आहे. शिक्षणसंस्था चालल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत याच्याशी मी सहमत आहे; परंतु शिक्षणसंस्था चालकांनीही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चांगले दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्रात प्रथम धर्मादाय शिक्षणसंस्था सुरू करण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले. या प्रसंगी आमदार निकम म्हणाले, महाराष्ट्रातील शाळांना विकलांग करण्याचे काम शासन करत आहे. शिक्षणाचा विचार राजकारणाच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे. शासनाने शिक्षकभरतीत हस्तक्षेप करू नये. शासनाने हस्तक्षेप केल्यामुळेच आज भरतीत घोटाळे होत असल्याचे विजय गव्हाणे यांनी सांगितले. या अधिवेशनासाठी राज्यातील विविध भागातील संस्थाचालक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. या वेळी संस्थाचालकांनी आपली मते मांडली.
---
...तर शाळांचा दर्जा चांगला राहील
ग्रामीण भागातील पालक मुलांना शहरातील शाळांमध्ये पाठविण्यास उत्सुक असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडत आहेत. शासनाने बंद पडलेल्या शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शाळा टिकवणे, वाढवणे हे मोठे आव्हान आहे. एकाच शिक्षकाला सर्वच विषय शिकवावे लागत असल्याची आज ग्रामीण भागात परिस्थिती आहे. शासनाने शाळांना अनुदान दिले पाहिजे. शाळेत चित्रकला, कार्यानुभवच शिक्षक असतील तर शाळांचा दर्जा चांगला राहतो, असे आमदार निकम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.