

swt1627.jpg
71094
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दीपक केसरकर. बाजूला (डावीकडून) अशोक दळवी, जिल्हाप्रमुख संजू परब व आदी.
हत्ती, गव्यांचा उच्छादाबाबत वनमंत्र्यांशी बोलणार
दीपक केसरकरः नुकसानीसंदर्भात लवकरच बैठक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः हत्ती आणि गव्यांचा उच्छाद सावंतवाडी मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे नुकसान या प्राण्यांकडून होत असल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील हत्ती पकड मोहिमे संदर्भात मी पुन्हा एकदा वनमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत येथील वन अधिकाऱ्यांशीही बैठक घेणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
आमदार केसरकर यांनी आज येथील आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, विद्याधर परब, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी बसस्थानकाचा बीओटी तत्वावर विकास होणार आहे. ते पूर्णपणे अत्याधुनिक असे स्थानक होईल. येथे पडलेले खड्डे व डागडुजी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक सावंतवाडीत उभे राहील. सावंतवाडीकरांनी मला अनेक वर्षे प्रेम दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीची सत्ता नगरपंचायतीत दिसेल.’’
आंबोलीत वन विभागाकडून पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. पर्यटकांना ये-जा करण्यासाठी याचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाशी चर्चा करून होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता घेतली जाईल, असेही श्री. केसरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यासह विशेषतः सावंतवाडी मतदारसंघांत हत्ती आणि गव्यांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठे नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकरीही हतबल झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील हत्ती पकड मोहिमेसंदर्भात मी पुन्हा एकदा वनमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.’’ शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत येथील वन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
चौकट
गवस कुटुंबीयांची भेट घेणार
मांगेली-कुसगेवाडी वीजेचा जोरदार धक्का लागून तरुणाचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. महावितरणने दक्षता घेणे आवश्यक असून हा अपघात कसा झाला? याची चौकशी केली जाणार आहे. कोणाचाही जीव जाणार नाही यासाठी सुचना करणार आहे. इतरही वीजेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.