जामसंडेमध्ये रक्तदान चळवळीला बळ

जामसंडेमध्ये रक्तदान चळवळीला बळ

Published on

71911

जामसंडेमध्ये रक्तदान चळवळीला बळ

गोगटे विद्यालयात शिबिर; गुजराती नवरात्र मंडळ, सिंधू रक्तमित्रचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० : जागतिक रक्तदातादिनाचे औचित्य साधून तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगडच्या संयुक्त विद्यमाने जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात सहा महिला रक्तदात्यांसह एकूण ४६ दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी ५० पेक्षा जास्त रक्तदान केलेल्या दात्यांचा तसेच रक्तदान क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गुजराती नवरात्र मंडळाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी संतोष मयेकर (दाभोळे), उद्धव गोरे (जामसंडे), विरेंद्र जोईल (किंजवडे), संजय कुळकर्णी (जामसंडे), पंढरीनाथ आचरेकर (वाडा), रविकांत चांदोस्कर (जामसंडे), प्रदीप लिमये (दाभोळे) यांना रक्तदानासाठी सात्यत्य ठेवल्याबदल तसेच वैभव वारीक (पडेल), संदीप साटम (शिरगाव), दयानंद तेली (हिंदळे), अनिल कोरगावकर (देवगड), प्रकाश जाधव (जामसंडे), विजयकुमार जोशी (इळये), महेश शिरोडकर (शिरगाव) यांना रक्तदान चळवळ वृद्धींगत करण्याबाबतच्या योगदानासाठी सन्मानित केले.
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान देवगडकडून जिल्हा रक्तपेढी ओरोसचे बी. टी. ओ. डॉ. अमित आवळे, अधिपरिचारिका सौ. प्रांजल परब यांचा सत्कार झाला. युवापिढीने मनात कुठलाही किंतु न ठेवता कायम रक्तदान करून गरजू रुग्णांचा जीव वाचविण्याचे पुण्यकर्म करावे, असे आवाहन डॉ. आवळे यांनी केले. जामसंडे येथील मुकुंद फाटक नर्सिंग विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रतिष्ठानच्या आवाहनास प्रतिसाद देत रक्तदान केले. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखेकडून पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. विजयकुमार जोशी, प्रसाद दुखंडे यांनी सूत्रसंचालन केले. माजी आमदार अजित गोगटे यांनी कार्यक्रमादरम्यान सदिच्छा भेट दिली. सिंधू रक्तमित्र शाखा देवगडचे सचिव प्रकाश जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com