जाधव

जाधव

Published on

-rat२३p६.jpg
२५N७२४६९
ः यतीन जाधव
--------
‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी
डॉ. यतीन जाधव
चिपळूण : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) या संस्थेच्या १६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव, तर कार्याध्यक्षपदी अरूण इंगवले यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी (२०२५ ते २०३०) केली गेली आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करून पुढील वाटचालीसाठी सज्ज झालेल्या संस्थेच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत भूतपूर्व अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक आणि धनंजय चितळे, डॉ. तानाजीराव चोरगे उपस्थित होते. अधिकारी मंडळासाठी संस्थेचे आजीव सदस्य राजेश जोष्टे यांनी ठराव मांडला. त्यानुसार अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव यांच्यासह सुनील खेडेकर, राष्ट्रपाल सावंत आणि मिलिंद गोखले यांची नावे सुचवण्यात आली व ती सर्वानुमते स्वीकारण्यात आली. कार्यकारिणीच्या निवडीत प्रकाश काणे यांनी ठराव मांडला. त्यानुसार पुढील सदस्यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष- अरूण इंगवले, सदस्य- विनायक ओक, धीरज वाटेकर, श्रीराम दांडेकर, मनीषा दामले, अभिजित देशमाने, सुबोध दीक्षित, मानसी पटवर्धन, आराध्या यादव, स्वरदा कुलकर्णी, धनंजय चितळे. आय-व्यय निरीक्षकपदी मंगेश बापट यांची नियुक्ती करण्यात आली.


निकम विद्यालयात
वह्यांचे वाटप
सावर्डे ः सावर्डे येथील निकम विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वीस हजारांच्या १९८० वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचा लाभ विद्यालयातील ३३० विद्यार्थ्यांनी घेतला. सेवानिवृत्त जिल्हा वाहतूक अधिकारी शशिकांत पावसकर, उद्योजक दीपक कोलवणकर व राकेश सावर्डेकर यांनी वह्या दान केल्या. या वेळी प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, पालक, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.

हेगशेट्ये महाविद्यालयात
योगदिन साजरा
रत्नागिरी ः एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. पतंजलीच्या योगशिक्षिका शुभांगी सोळंके यांनी विविध प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. कपालभारती, ताडासन, वृक्षासन, अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार असे विविध योगप्रकार विद्यार्थ्यांनी केले. कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योग प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला. या सेशनमध्ये प्राध्यापकांसाठी विविध योगासने करण्यात आली. प्राचार्य डॉ. संजय गवाळी यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com