मुकुल माधव विद्यालय संस्कारपीठ
-rat२४p२१.jpg-
२५N७२७३३
रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयाची इमारत.
---------
मुकुल माधव विद्यालय संस्कारपीठच
रोहित देशपांडे ः शाळेचा १५वा वर्धापनदिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : मुकुल माधव विद्यालय हे केवळ ज्ञानाचे केंद्र नसून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे संस्कारपीठ आहे. केवळ १५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज ५००हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. शाळा पंधरावा वर्धापनदिन साजरा करत आहे. या यशामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थेचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक रोहित देशपांडे यांनी केले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजने दान केलेल्या १० एकर जागेवर मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकाराने मुकुल माधव विद्यालय सुरू झाले. त्यांनी पुढे सांगितले की, शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिक्षण, कला, पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये शाळेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शाळेमध्ये सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन, वीज प्रतिबंधक यंत्रणा आणि स्वतःचा भाजीपाला तुकडा अशा सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शिक्षणाची अनुभूती मिळते.
शाळेचा दहावी, बारावीचा निकाल सलग १०० टक्के लागत आहे. यापूर्वी विद्यालयाला नवी दिल्लीतील सिल्व्हर झोन फाउंडेशनकडून शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. या सर्व यशामागे आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाब्रिया यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळेच मुकुल माधव विद्यालयाने यशाची शिखरे गाठली असल्याचे मुख्याध्यापक देशपांडे यांनी नमूद केले.
---
ग्रीन स्कूलमध्ये नववा क्रमांक
२०२५ मध्ये भारतातील ग्रीन स्कूलमध्ये ९वा क्रमांक मिळवला असून, न्युयॉर्क येथे होणाऱ्या ग्रीन स्कूल परिषदेत आमंत्रण मिळाले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा सन्मान म्हणावा लागेल. समाजसेवा व मूल्यशिक्षण हेच शाळेचे ब्रीद आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासली आहे. जसे की, समुद्रकिनारा स्वच्छता, निःशुल्क आरोग्य शिबिरे, ग्रंथदान उपक्रम यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.