रोटरी पदाधिकाऱ्यांचे २९ ला पदग्रहण
रोटरी पदाधिकाऱ्यांचे
रविवारी पदग्रहण
खेड : रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी उद्योजक मंदार संसारे तर सचिवपदी अॅड. मिलिंद जाडकर यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी सुयोग बेडेकर यांची नियुक्ती केली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २९ रोजी सायंकाळी ७ वाजता रोटरी स्कूलच्या पटांगणात आयोजित केला आहे. नूतन अध्यक्ष मंदार संसारे सामाजिक, शैक्षणिक व उद्योगक्षेत्रात कार्यरत आहेत. गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असतात. पंचनदी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला. ते रोटरी स्कूलचे संचालकदेखील आहेत. सचिव अॅड. जाडकर हे वकिलीसह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
खेडमधील पूरग्रस्त
दुकानांचे पंचनामे
खेड : जगबुडीच्या पुराचे पाणी १९ जूनला किनाऱ्यावरील मुख्य बाजारपेठेतील घरांमध्ये शिरले होते. सुमारे ५ तास पूरस्थिती कायम होती. या पुराचा फटका १७० दुकानांना फटका बसला असून, महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. बाजारपेठेतील कोलमडलेले व्यवहार पूर्वपदावर येत असून, काही व्यापारी अजूनही दुकानांच्या दुरुस्तीकामात गुंतलेले आहेत. दुकानांसह घरांचे पंचनामे झाले असले तरीही नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एक-दोन दिवसात बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘कोळबांद्रे शाळेत’
विद्यार्थ्यांच योगासनं
गावतळे ः दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा कोळबांद्रे कुंभारवाडी शाळेत मुख्याध्यापक मंगेश कडवईकर यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्त्व समजावून सांगितले. विविध मुक्त हालचाली झाल्यानंतर प्रत्यक्ष योगप्रकारांना सुरुवात करण्यात आली. कडवईकर यांनी योगप्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याप्रमाणे योगप्रकार करूनही घेतले. त्यामध्ये ताडासन, वृक्षासन, कोणासन, हलासन, पद्मासन, शवासन आदी विविध आसने तसेच प्राणायाम प्रात्यक्षिके करून घेतली. शेवटी दोरीउड्यांचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी करून दाखवले. या वेळी शाळेचा माजी विद्यार्थी गंधर्व इनरकर याने शिक्षकांना मदत केली.
रावणंगवाडीत
आरोग्य तपासणी
साडवली ः देवरूखजवळील निवे बुद्रूक उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या रावणंगवाडी येथे संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कीटकजन्य आजार, संशयित क्षयरोग तपासणी, कुष्ठरोग तपासणी, परिसर स्वच्छता, पाणी शुद्धीकरण, महिला आरोग्य तपासणी करून औषधोपचार शासनातर्फे फिरता दवाखाना उपक्रमातून मोफत करण्यात आले. त्यामध्ये ४१ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. विस्तार अधिकारी लीना पुजारी, डॉ. खाडे, नरोटे, प्रकाश झोरे, आरोग्यसेविका प्रिया सांडीम, आरोग्यसेवक विजय राऊत, आशासेविका वैदेही चाळके मोहिमेत सहभागी होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.