भविष्यातील संधी ओळखून निर्णय घ्या

भविष्यातील संधी ओळखून निर्णय घ्या

Published on

73069

भविष्यातील संधी ओळखून निर्णय घ्या

तुषार विश्वासराव ः खांबाळे येथे गुणवंतांचा सत्कार, साहित्य वाटप

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ ः विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. स्वतःची क्षमता ओळखावी आणि भविष्यात कोणत्या संधी करियरच्या दृष्टीने असतील, याचा विचार करून निर्णय घ्यावा. असे आवाहन क्षत्रीय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे उपाध्यक्ष तुषार विश्वासराव यांनी येथे व्यक्त केले.
क्षत्रीय धारपवार चॅरिटेबल संस्थेतर्फे तालुक्यातील खांबाळे आणि एडगाव या दोन गावांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच प्राजक्ता कदम, संस्थेचे सदस्य विनोद पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, तालुकाध्यक्ष जगदीश पवार, लवू पवार, प्रियांका पवार, गणेश पवार, उमेश पवार, राखी पवार, अस्मिता चव्हाण, नितीन कदम, जयश्री शेट्ये, हनुमंत सुतार, आनंद पवार आदी उपस्थित होते.
श्री. विश्वासराव म्हणाले, ‘‘संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रमांवर आमचा भर आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि गुणवंत विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे या हेतुने हे उपक्रम आयोजित करतो. दहावी, बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेणे आवश्यक असते. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर निर्णय घेताना मनाची घालमेल होते. त्यामुळे निर्णय घेताना काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्याला नेमक्या कोणत्या क्षेत्रात आवड आहे, हे पालकांनी समजून घ्यावे. विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी. जग झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे पाच-सहा वर्षांनंतर कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होतील, याचा विचार करून निर्णय घ्या.’’ सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. केंद्रप्रमुख नितीन कदम यांनी मनोगत व्यक्त केले. हनुमंत सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com