पंचशील, अंधश्रद्धा निर्मूलनतर्फे
ओरोस महामार्गालगत वृक्षारोपण

पंचशील, अंधश्रद्धा निर्मूलनतर्फे ओरोस महामार्गालगत वृक्षारोपण

Published on

73266

पंचशील, अंधश्रद्धा निर्मूलनतर्फे
ओरोस महामार्गालगत वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः पंचशील सेवा ट्रस्ट आदर्शनगर ओरोस व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिजामाता चौक ते हुमरमळा महामार्गालगत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून हा वृक्षारोपणाचा उपक्रम संयुक्तपणे साजरा करण्यात येतो.
ओरोस ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग मालवणकर यांचे हस्ते वृक्षलागवड करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचशिल सेवा ट्रस्टचे आदर्शनगरचे अध्यक्ष संजय खोटलेकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, सदस्य राजन वालावलकर, नामदेव मठकर, चंद्रकांत कदम गुरुजी, शंकर भोगले, भास्कर चव्हाण, शरद सोनवडेकर, अरुण सावले आदी उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा कडूलिंब, साग, बदाम, चिंच, वड, ऐन अशी कायमस्वरूपी सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सिव्हिल हॉस्पिटल अधिपरिचारिका शोभा कसालकर यांनी आपल्यावतीने या कार्यक्रमाला वृक्षांचा पुरवठा केला होता. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र घोगळे यांनी नाष्ट्याची व्यवस्था केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com