-दुर्मीळ दीपकाडी वनस्पतींचे दापोलीत संवर्धन
-rat२६p५.jpg-
२५N७३२५४
गावतळे ः साडवली, जैतापूर, सागवे आदी ठिकाणच्या कातळावर दीपकाडीचे अस्तित्व दिसून येते.
----
दुर्मिळ कोकण दीपकाडी वनस्पतींचे दापोली परिसरात संवर्धन
राज्यमंत्री योगेश कदम ः वनविभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, मानवी हस्तक्षेपाने अस्तित्वाला धोका
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २६ ः दापोली परिसरात गेली दहा वर्षे दुर्मिळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ही वनस्पती कोकणात केवळ २३ ठिकाणीच आढळते आणि मानवी हस्तक्षेपामुळे तिचा अधिवास झपाट्याने नष्ट होत आहे. त्यामुळे दीपकाडी व तिच्या नैसर्गिक अधिवास असलेल्या कातळी सड्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
दीपकाडी संवर्धनासाठी वन्यप्राण्यांचे बचाव आणि संशोधन (Wild Animal Rescue and Research) ही संस्था आणि वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगळ सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी दीपकाडी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या वनस्पतीचे दापोलीतील सड्यांवर पुनर्स्थापन करून संवर्धन व पुनरूत्पादन केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी स्थानिक जनतेचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यामुळे लवकरच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजित केले आहेत. या उपक्रमासाठी कातळभागांची आवश्यकता आहे. त्यासाठी काही नागरिकांनी आधीच आपली जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. जर कोणी अशी जागा उपलब्ध करून देऊ इच्छित असेल तर त्यांनी पुढे येऊन या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्यमंत्री कदम यांनी केले आहे. दापोली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्याबरोबर मंत्री कदम यांनी चर्चा केली.
---
चौकट
कोकणात ३१.३७५ हेक्टर क्षेत्रावर अस्तित्व
एकदांडी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव दीपकॅडी कोंकनेन्स (Dipcadi concanense) असे असून, तिचे अस्तित्व फक्त कोकणात आणि तेही केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मर्यादित ठिकाणी नोंदवले गेले आहे. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी; मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचे अस्तित्व दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण फक्त २३ ठिकाणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी १९ ठिकाणे रत्नागिरी जिल्ह्यातील असून, उरलेली पाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली (देवरूख), रत्नागिरी विमानतळ, जैतापूर, सागवे, देवाचे गोठणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) ही या वनस्पतीच्या आढळाची प्रमुख ठिकाणे आहेत. या प्रजातीचे अस्तित्व कोकणातील ३१.३७५ हेक्टर क्षेत्रावर आढळले आहे.
------
कोट
लोकसहभागाशिवाय संवर्धन शक्य नाही, या भावनेतूनच या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. जैवविविधतेचे रक्षण हे प्रत्येकाचे सामूहिक कर्तव्य आहे आणि भविष्यासाठी तिचे संवर्धन गरजेचे आहे.
- योगेश कदम, राज्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.