पोलिस निरीक्षक कोल्हे
यांचा आचरा येथे सत्कार

पोलिस निरीक्षक कोल्हे यांचा आचरा येथे सत्कार

Published on

73308

पोलिस निरीक्षक कोल्हे
यांचा आचरा येथे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : स्वराज्य संघटना, मातृत्व आधार वाईल्ड लाईफ रेस्क्यूलर सिंधुदुर्ग, यशराज प्रेरणा आचरा, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण पोलिस ठाण्यातून बदली झालेले पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. येथील पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर कोल्हे यांनी गेल्या काही वर्षांत चांगले काम केले. मदतकार्यात ते नेहमी पुढे असायचे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातही उपस्थिती दर्शवित चांगले मार्गदर्शन केले. त्यांची ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत बदली झाली आहे. यानिमित्त विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वराज्य ढोलताशा पथकाच्या संस्थापिका शिल्पा खोत, मातृत्वचे संस्थापक संतोष लुडबे, मंदार सरजोशी, दादा वेंगुर्लेकर, श्रमिका लुडबे, गौरी सातार्डेकर, भारती वायरकर, कल्पिता जोशी, आनंद बांबर्डेकर, स्वप्नील परुळेकर, शांती तोंडवळकर, अमन गोदावले, श्रीकांत मालवणकर, मुन्ना हरचकर, संजय अंजनकर, संदीप नेवाळकर, संदीप भगत, संतोष सकपाळ, जगदीश तोडणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com