जिल्ह्यात ९०० हेक्टरवर भात लावण्या
-rat२६p८.jpg-
२५N७३३०६
रत्नागिरी ः तालुक्यातील काजरघाटी येथे उगवून आलेली भातरोपं.
-rat२६p९.jpg-
२५N७३३०७
संगमेश्वर ः तालुक्यातील राजवाडी येथे भातलावण्या करताना महिला शेतकरी.
-------
जिल्ह्यात ९०० हेक्टरवर भातलावणी
पूरक वातावरण ; लावणीच्या वेळापत्रकावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः सध्या समाधानकारक पावसामुळे भातशेतीला पूरक वातावरण असून, जिल्ह्यात आतापर्यंत ९०० हेक्टरवर भातलावणी करण्यात आली आहे. यंदा मॉन्सून लवकर दाखल झाल्यामुळे त्याचे परिणाम उगवून आलेल्या भातरोपांवर काही ठिकाणी दिसत आहेत तसेच जून महिन्यात पावसाचा विश्रांती काळ लांबण्याच्या शक्यतेने भातपेरण्या आठ ते दहा दिवस विलंबाने झाल्या होत्या. त्यामुळे लागवडीच्या वेळापत्रकावरही परिणाम दिसत आहे.
जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत जून महिन्यात अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुलनेत गतवर्षी ६२१ मिमी पाऊस झाला होता. त्यात सर्वाधिक पाऊस खेड ९२६, लांजा तालुक्यात ९२४ मिमी, मंडणगडात- ८७७, राजापूर- ८०३ तर सर्वात कमी गुहागर तालुक्यात ६७९ मिमी पाऊस झाला. उर्वरित दापोली ८५९, रत्नागिरी ७२४, चिपळूण तालुक्यात ७४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी अनपेक्षितपणे १५ मे पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग आठ दिवस पाऊस कोसळत होता. शेतजमीन पाण्याने भरून गेल्यामुळे भातरोपं रुजविण्यासाठी पोषक स्थिती नसल्याचेच शेतकऱ्यांचे मत होते. कृषी विभागासह भात संशोधन केंद्राकडूनही भातपेरण्या विलंबाने करा, असा संदेश देण्यात आला तसेच शेतकऱ्यांनी रोऊ पद्धतीने भातपेरणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. सुदैवाने, २९ मे पासून सलग चार दिवस कडकडीत ऊन पडल्याने भातरोपांची पेरणी उगवण्यासाठी पूरक स्थिती होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन १० जूनच्या दरम्यान पेरण्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे २३ दिवसांनी रोपांची उगवण व्यवस्थित झाल्यानंतर पुनर्लागवडीला सुरुवात केली जाते; मात्र ओल्या जमिनीवर पेरण्या झाल्याने काही ठिकाणी पेरलेले बी जमिनीवर दिसू लागले. ते उगवून न आल्याने रोपांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी रोपांसाठी दोनवेळा पेरण्याही केल्या आहेत. जिल्ह्यात २० जूननंतर पावसाचा जोर कमी झाला असून, रोपांची वाढही व्यवस्थित होत आहे.
जिल्ह्यात ४ हजार ५८ हेक्टरवर भातपेरण्या झाल्या आहेत. सध्या पडणारा पाऊस भातलावणीसाठी पोषक असल्याने पुरेशी वाढ झालेली भातरोपं काढून लावणीवर शेतकरी भर देत आहेत. आतापर्यंत ९०० हेक्टरवर लावगड झाली आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, मंडणगड, दापोली तालुक्यात भात पुनर्लागवड कमी प्रमाणात झालेली आहे.
----
पुनर्लागवड झालेले क्षेत्र
तालुका* भातक्षेत्र (हेक्टर)
मंडणगड* २.५०
दापोली* १५
खेड* २०
गुहागर* ११०
चिपळूण* २
संगमेश्वर* २५०
रत्नागिरी* ४.५०
खेड* २०
लांजा* २२०
राजापूर* २७२
-----
कोट १
लवकर आलेल्या पावसाचा परिणाम खरीप हंगामातील भातशेतीवर होण्याची शक्यता होती; परंतु कालांतराने वातावरण पोषक होत गेले. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी रोऊ पद्धतीपेक्षा पुनर्लागवड पद्धतीनेच शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. सदाशिव सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक
-----
कोट २
पाऊस लवकर पडल्यामुळे ओल्या जमिनीत भातपेरणी करावी लागली. पुन्हा पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी बियाणे वर आले आणि वाया गेले. रोपांसाठी आम्हाला दोन ते तीनवेळा पेरणी करावी लागली. तरीही पुरेशी रोपं मिळालेली नाहीत. त्यामुळे लावणी झाल्यावर रोऊ पद्धतीने भातपेरणी करण्याची वेळ येणार आहे. संगमेश्वरच नव्हे तर अन्य तालुक्यातही अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
- बंड्या लिंगायत, राजवाडी, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.