कृत्रिम बुध्दीमत्ता शत्रू नसून मित्र

कृत्रिम बुध्दीमत्ता शत्रू नसून मित्र

Published on

-rat२७p१.jpg-
२५N७३४६१
रत्नागिरी ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यशाळेत बोलताना विनायक कदम. शेजारी उपस्थित मान्यवर.
---
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा आपला शत्रू नसून मित्र
विनायक कदम ः राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान वापरून कार्यालयीन कामकाज कमी वेळात प्रभावीपणे करता येते. त्यामुळे एआय हे शत्रू नसून मित्र आहे, असे एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्यायदिनाचे औचित्य साधून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग या विषयावर साहाय्यक आयुक्त समाजकल्याण आणि जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्यायभवनात आज कार्यशाळा झाली. या वेळी साहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, महात्मा जोतिबा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल नवरू, पोलिस निरीक्षक पवनकुमार चौधरी आदी उपस्थित होते.
कदम यांनी संगणकीय सादरीकरण करताना काही प्रात्यक्षिक करून दाखवून कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व प्रभावी असल्याचे सांगितले. रनवे, पायलट, चॅट जीपीटी, भाषिनी, डेमो एआय, हेड्रा, ग्रोक एआय, डीप सीक, जनरेटिव्ह एआय आदींचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करायचा, त्याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, मजकूर टायपिंगसाठी गुगल डॉक्स, गुगल लेन्स, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामर्ली त्याचबरोबर संगणकीय सादरीकरणासाठी एआय पीपीटी, प्रेझेटेंशन एआय, आर्टवर्कसाठी कॅनवा, १२३ ॲप याबाबतची माहिती दिली. दैनंदिन प्रशासकीय कामकाजात कमी वेळेत प्रभावीपणे काम करण्यासाठी एखादे व्हिजन डॉक्युमेंटसारखे दस्तावेज अवघ्या काही मिनिटात तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्याप्रकारे करता येऊ शकतो. त्यासाठी काटेकोरपणे त्याच्याकडून काम करून घेता आले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com