कॅन्सर तपासणी शिबिराची मागणी
-rat२७p१०.jpg-
25N73488
रत्नागिरी : महिलांच्या कर्करोगाविषयीच्या तपासणी शिबिराचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्याकडे यांना देताना भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी.
----
कर्करोग तपासणी शिबिर घ्या
भाजप महिला मोर्चाची मागणी; जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : दक्षिण रत्नागिरी भाजप महिला मोर्चातर्फे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देण्यात आली. सध्या समाजात वाढत्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शहर व जिल्हास्तरावर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्याकडे मागणी करण्यात आली.
या बैठकीत महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये तसेच जिल्ह्यात महिलांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्याबाबत सविस्तर प्रस्ताव मांडला. डॉक्टरांनी यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
या वेळी महिला मोर्चाच्यावतीने निवेदनही सादर केले. महिलांमध्ये कॅन्सरसंबंधी जागरूकता वाढवणे, लवकर निदान व उपचारासाठी मदत करणे आणि आरोग्यविषयक जनहिताचे कार्य प्रभावीपणे राबवणे, हा भाजपचा हेतू आहे. भाजपा महिला मोर्चा लवकरच या संदर्भात योजना जाहीर करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, सरचिटणीस नुपूर मुळे, शहराध्यक्षा पल्लवी पाटील, तालुकाध्यक्ष प्रियल जोशी, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, वैभवी शिवलकर, कामना बेग, मनाली राणे, सारिका शर्मा उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.