पर्यटनाच्यादृष्टीने भाटये गावाचा विकास
-rat२७p१२.jpg-
२५N७३४९२
रत्नागिरी ः रत्नागिरी शहराला पावससह सागरी महामार्गाला जोडणारा हा भाट्ये पूल.
------
पर्यटनाच्यादृष्टीने भाटये गावाचा विकास
उदय सामंत ः झरी विनायक मंदिरापर्यंत चौपदरीकरण, वॉकिंग ट्रॅक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ः रत्नागिरी शहराबरोबरच किनारपट्टी भागाच्या विकासावरही लक्ष देण्यात येत असून, पर्यटनस्थळ म्हणून भाट्ये किनाऱ्याचाही विकास होणार आहे. भाट्ये पूल ते झरी विनायक मंदिरदरम्यान पर्यटनाच्यादृष्टीने रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार असून, वॉकिंग ट्रॅकही उभारला जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात अनेक धार्मिक व निसर्गसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. येथील खाड्यांमधील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. रत्नागिरी मतदार संघातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या विकासासाठी विकास आराखडा, निवेंडी येथे होऊ घातलेले प्राणी संग्रहालय, बोटिंग प्रकल्प, रत्नागिरी शहरातील शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, श्री विठ्ठल मूर्ती, थ्रीडी मल्टीमीडियासारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.
शहराजवळच असलेल्या भाट्ये गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढवय्या सेनानी मायाजी भाटकर यांची समाधी आहे. याच गावाला एका बाजूला समुद्रकिनारा तर एका बाजूला खाडीने वेढलेले असून, या गावच्या सौंदर्यात भर टाकत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील झरी विनायक मंदिरही भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या किनाऱ्याचाही पर्यटनदृष्ट्या विकास केला जात आहे. पार्किंग व्यवस्था, समुद्रकिनारी पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी सुविधा, किनाऱ्यावर विजेची सुविधा आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या गावात नारळ संशोधन केंद्र असून, या ठिकाणीही अनेक पर्यटक, अभ्यासू शेतकरी माहिती घेण्यासाठी व भेट देण्यासाठी येत असतात. भाट्ये गावातूनच पावसकडे जाणारा मार्ग असून सिंधुदुर्ग, राजापूला जाणाऱ्या पर्यटक व प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या रस्त्याला मागील काही वर्षात मोठे महत्व प्राप्त झाले आहे. भाट्ये किनाऱ्याच्या विकासाच्यादृष्टीने भाटये पूल ते झरी विनायक मंदिर रस्ता जवळपास दीड किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्याला लागूनच सुरूबनाच्या बाजूने वॉकिंग ट्रॅकही उभारला जाणार आहे. यासाठी सात ते आठ कोटींचा खर्च अपेक्षित असून, याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
चौकट
भाट्ये खाडीतही हाऊसबोट प्रकल्प
भाट्ये गावाला सुंदर समुद्रकिनाऱ्यासह प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रासोबतच राज्यशासनाने विभागीय कृषी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापिठाचे सागरी संशोधन केंद्र, एनसीसीच्या विविध उपक्रम किनाऱ्यावर होत असतात. भाट्ये खाडीमध्ये हाऊसबोट प्रकल्पही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.