रत्नागिरी- महाराजांचा गनिमी कावा
rat27p९.jpg-
73483
रत्नागिरी : कुवारबाव येथे एनसीसी भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांना युद्धनौकेची प्रतिमा देताना या प्रसंगी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर आणि एनसीसी कॅडेट.
---------
मावळ्यांचे मनोधैर्य प्रत्येकाच्या मनगटामध्ये हवे
पालकमंत्री उदय सामंत; एनसीसी भवनाचे भूमीपूजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि त्यांच्या मावळ्यांचे मनोधैर्य हे प्रत्येकाच्या मनगटामध्ये असलं पाहिजे, ते दाखवून द्या. महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर हा देश सगळ्या जगाला भारी पडू शकतो. एनसीसीमध्ये जे जे काय शिकवलं जातं ते आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना सांगून त्यांच्यामध्ये देखील देशभक्ती निर्माण करा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी भवनाचे भूमीपूजन कुवारबाव येथे आज सकाळी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, डीआयजी डी. एन. उपाध्याय, के. राजेशकुमार, शैलेश गुप्ता, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मिलिंद कुलकर्णी, प्रशांत चतुर, सतीश शेवडे उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ४२ कोटी रुपये खर्च करून एनसीसी भवन उभारले जात आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. एनसीसीमुळे देशभक्तीची भावना वाढीला लागते. भारताने पाकला कशी अद्दल घडवली हे आपण पाहिलं. आज महिलासुद्धा देशरक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुरुषांच्या पुढे आहेत. राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, देशभक्ती जागृत व्हावी हे सांगावं लागत नाही. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून जनजागृती करण्याचं काम केलं पाहिजे.
अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये केवळ आपणच नव्हे तर कुटुंब, शेजारीपाजारी, अनेकजण बरबाद होतात. सामाजिक स्तरावर समाजालादेखील बरबाद करतो. आजूबाजूची मुलं अंमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत आणि अंमली पदार्थाचं सेवन करायला न देणं हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. कमांडर के. राजेशकुमार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
चौकट १
धर्मामध्ये तेढ नको
दोन समाजामध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सगळ्यांनी मिळून अशा प्रवृत्तींना तिलांजली देण्याचे काम केले पाहिजे. त्याचा आदर्श सगळ्या मिलिटरी ऑफिसर्सकडून घेतला पाहिजे, असे पालकमंत्री सामंत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.