सिंधुदुर्गातील तीन हजार विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

सिंधुदुर्गातील तीन हजार विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

Published on

73531

सिंधुदुर्गातील तीन हजार विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

जिल्हाभर विविध उपक्रम; अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त पोलिसांचा पुढाकार

ओरोस, ता. २७ ः जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४३ शाळा, महाविद्यालयांमध्ये रिल्स, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा असे उपक्रम राबविले. यानिमित्त जिल्ह्यातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना नशा मुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
अमली पदार्थ सेवन ही एक जागतिक व गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे केंद्राने १९८५ मध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला. सद्यस्थितीत केंद्र, राज्य सरकारतर्फे प्रतिबंध आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील अमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री, परराज्यातून जिल्ह्यात होणारी वाहतूक यांना प्रतिबंध करण्यासाठी गुरुवारी (ता.२६) जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष मोहीम राबविली.
जिल्हा पोलिस यंत्रणेने जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनीधी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, औषधविक्रेते, समुपदेशक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक प्रशासनातील अधिकारी व प्रतिनिधींना समाविष्ठ करून सर्वस्तरावरुन अमली पदार्थ विरोधी जनजागृती केली. यासाठी जिल्हास्तरावर उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे स्तरावर विशेष पथके तयार करून, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत करण्यात येणारी जागृती जनमानसात घरा-घरांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.
शाळा, कॉलेज, विद्यालये, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, कारखाने, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी, विशेष कार्यशाळांद्वारे, सोशल मीडियाद्वारे हा दिन राबविण्यात आले. विशेष मोहिमेमध्ये विद्यार्थी, तरुण-तरुणी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत व्यक्ती, नागरिकांपर्यंत पोहचून अवैध मार्गाचा अवलंब करून अमली पदार्थाचे सेवन, वाहतूक, विक्री, उत्पादन केल्यामुळे होणारे दुष्परीणाम याबाबत मार्गदर्शन केले. अवैधरित्या अंमली पदार्थांचे सेवन, उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक होत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही केले.
सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी, फार्मसी कॉलेज येथे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांसमवेत अंमली पदार्थाविरोधात शपथ घेतली. अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी सिंधुदुर्गनगरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात मार्गदर्शन केले. वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस वितरण केले. एकूण ४३ शाळा, कॉलेजमध्ये रिल्स, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असे उपक्रम घेऊन जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना नशामुक्ती अनुषंगाने मार्गदर्शन केले. पथनाट्य, पदयात्रांचे आयोजन करून जिल्ह्यातील विविध लहान-मोठ्या गावांपर्यंत पोहचून स्थानिक नागरिकांचे प्रबोधन केले. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार यात सहभागी झाले.
-----------------
स्वाक्षरी मोहीम, पदयात्रा, स्थानिकांशी संवाद
कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, दोडामार्ग, देवगड, कुडाळ येथील मुख्य चौकात सिंधुदुर्ग जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याच्या दृष्टीने विशेष स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यास स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक, बसस्थानक, रिक्षा स्थानक व चौकांमध्ये नशा मुक्तीचे बॅनर घेऊन पदयात्रेचे आयोजन करून स्थानिकांशी संवाद साधून जनजागृती केली. याच मुदतीत पोलिस ठाणे स्तरावर नेमलेल्या विशेष पथकांमार्फत अंमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतलेल्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com