-''विद्यार्थी दशा आणि दिशा''एक महत्त्वपूर्ण उपक्रम
rat२८p१.jpg-
KOP25N73740
रत्नागिरी-येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर आदी.
------------
''विद्यार्थी दशा आणि दिशा'' महत्त्वपूर्ण उपक्रम
डॉ.उदय सामंत ः थोर व्यक्तींचे आयुष्य विद्यार्थ्यांसाठी आदर्श
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी,ता. २८ : ज्ञानेश्वर महाराजांनी १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. सम्राट अशोकाने सम्राटपदाची जबाबदारी पेलली. छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला. अशा थोर व्यक्तींचं आयुष्य हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावं. त्यासाठी शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवली पाहिजे, असे विचार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये काल झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते. या प्रसंगी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, सायबर सेलच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, हा कार्यक्रम म्हणजे केवळ माहितीचा नव्हे तर संस्कारांचाही संगम आहे. शाळेतील शिक्षक हे केवळ शिक्षक नसून, संस्कारवर्गाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याकडून शिक्षणाबरोबरच संस्कार मिळणे ही खूप मोठी संपत्ती आहे. हीच योग्य वेळ आहे. प्रत्येकाने अमली पदार्थांपासून दूर राहणं आणि इतरांनाही दूर ठेवून आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं स्वास्थ्य टिकवावे. अमली पदार्थांमुळे केवळ मुलंच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बिघडतो. शिक्षकांनी स्वत:हून अशा कामात पुढाकार घेऊन नवी पिढी घडवावी. कार्यक्रमास शिक्षक आणि १०वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.