हळबे महाविद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे
73778
हळबे महाविद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे
दोडामार्ग, ता. २८ : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात सायबर सुरक्षेबाबत व्याख्यान झाले. दोडामार्ग ठाण्याच्या पोलिस कर्मचारी कविता ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलिस कर्मचारी ठाकूर म्हणाल्या, ‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्यापार, बँकिंग आणि व्यक्ती यामधील संपर्काचे माध्यम मोबाईल बनला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठापर्यंत बराच वेळ सोशल मीडियावर खर्च होतो. अशावेळी प्रत्येक व्यक्तीने कोणतेही आर्थिक व्यवहार करताना तसेच सोशल मीडियावर जगत असताना सजग राहणे गरजेचे आहे; अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत म्हणाले, ‘दैनंदिन व्यवहारात आपला पिन कोणालाही शेअर करू नये, तो वारंवार बदलला पाहिजे. सोशल मीडियावर व्यक्त होताना जपून व्यक्त व्हा.’ व्यासपीठावर आयक्यूएसीचे प्रा. दिलीप बर्वे, पोलिस कर्मचारी मनाली कुबल, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय खडपकर आदी उपस्थित होते. डॉ. खडपकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी आभार मानले.
...................
73777
सावंतवाडी पोलिस ठाण्यातर्फे
अमली पदार्थांविरोधात जागृती
सावंतवाडी, ता. २८ ः जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त येथील पोलिस ठाण्यातर्फे काढलेल्या प्रभातफेरी व जनजागृती कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचे नववी व दहावीतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. भोसले उद्यान ते गांधी चौक यादरम्यान जागृती फेरी काढली.
यावेळी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल घोषणा दिल्या. घोषफलकांद्वारे जनजागृती केली. या रॅलीत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह चार अंमलदार सहभागी झाले. या उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहायक संचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदींनी प्रशंसा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.