संघर्षातून मिळालेले यश आनंददायी

संघर्षातून मिळालेले यश आनंददायी

Published on

73779

संघर्षातून मिळालेले यश आनंददायी

प्रा. संजीवनी पाटील ः नांदगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २८ ः संघर्षाशिवाय यश नसते आणि संघर्ष करून जे यश मिळते, त्याचा आनंद वेगळा असतो. स्वतःच्या क्षमता ओळखणे हेच यशाचे गमक असते. तुमच्यात जी क्षमता आहे, ती ओळखून वाटचाल करा, असे आवाहन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडीच्या प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. येथील हायस्कूलमध्ये आयोजित गुणवंत सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था व सरस्वती हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा हायस्कूलच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नाट्य-सिने कलाकार गणेश रेवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नागेश मोरये, मुख्याध्यापक सुधीर तांबे, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, संस्था पदाधिकारी शिवाजी लोके, श्रीधर मोरये, प्रसाद अंधारी, मारुती मोरये, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, मंगेश तांबे, पोलिसपाटील ऋषाली मोरजकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, मनोहर खोत, रज्जाक बटवाले आदी उपस्थित होते.
नागेश मोरये यांनी, आज चाळीस वर्षे आम्ही गुणवंताचा सत्कार करतो. यामुळे अनेक शाळांची प्रगती होत १०० टक्के निकाल लागला आहे. पुढची पिढी शिकावी, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. पालक व मुलांनी मेहनत घेतल्यास नक्कीच प्रगती होते, असे सांगितले. जिल्ह्यातील प्रथम क्रमांक चैतन्या सावंत, आर्या राणे, श्रेयस बर्वे, व्दितीय क्रमांक नक्षत्रा काळे, तृतीय ध्रुव तेंडूलकर, स्मितेश कडोलकर, हर्षदा हडलगेकर, रेश्मा पालव व नांदगाव प्रशालेतील मंदार हडकर, अवनी बोभाटे, सेजल मोरये यांच्यासह शिवाजी लोके, चंद्रकांत डामरे यांचे सत्कार करण्यात आले. संजय सावंत यांनी आभार मानले.
.................
शाळचे ऋण विसरू नका
शिक्षकांचे महत्त्व आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे. शाळेला कधीही विसरू नका. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा शाळेत जा. गगनभरारी रक्तातच असावी लागते, तरच कुठल्याही क्षेत्रात उत्तुंग गरुडझेप घेता येते. समोरच्याला समान वागणूक द्या. तुम्ही आपोआप मोठे व्हाल, असे प्रतिपादन कलाकार गणेश रेवडेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com