निसर्गाच्या साथीमुळे लावणी कामांचा आरंभ
-Rat२८p७.jpg-
P२५N७३७६४
मंडणगड ः तुळशी येथे पाणथळ खालटी शेतात लावणीसाठी रोपे काढताना शेतकरी.
------
निसर्गाच्या साथीमुळे लावणी कामांचा प्रारंभ
मंडणगड तालुका ; उशिरा पेरणी सफल, ९२७ मिमी पाऊस
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः तालुक्यात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस कायम राहिल्याने पेरणी रखडली होती; मात्र उशिरा पेरणी करूनही निसर्गाने साथ दिल्याने रोपांची वाढ चांगली झाली. लावणीयोग्य रोपे झाल्याने तालुक्यातील शेतकरी आता चिखलणी कामाकडे वळला असून, पाणथळ खलाटी भागात भातलावणी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतशिवार गजबजले आहे. तालुक्यात आतापर्यंत ९२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मे मध्येच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधता आला नाही. जून महिन्यात थोडी उघडीप मिळाल्याने ही संधी साधून शेतकऱ्यांनी पेरणी केली. रोपे तरारली असून, शेतकरी चिखलणी करून लावणीत गुंतला आहे. तालुक्यात यंदा २९१६ हेक्टर इतके क्षेत्र पिकाखाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यात भात, नाचणी, वरी या मुख्य पिकांसह तीळ, उडीद आदी पिकांचा समावेश आहे. २०२३ ला तालुक्यातील २६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिके घेतली गेली होती. २०२४ मध्ये यात २६५ हेक्टर क्षेत्र वाढले होते. यावर्षी २७०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१० पासून पुढील कालावधीत सरासरी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र लागवड होते. यात सातत्याने घट होत गेली आहे. जंगली श्वापदांचा उपद्रव, पर्यावरणात बदल व विविध कारणांनी घटलेले शेतीचे उत्पादन, नापिकी, कुशल-अकुशल मनुष्यबळाचा अभाव व उदरनिर्वाहासाठी महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर यामुळे खरीप हंगामातील पांरपरिक पिके धोक्यात आल्याने शेतीखालील क्षेत्र कमी होत आहे.
--
फळपीक लागवडीकडे ओढा
तालुक्याची मुख्य आर्थिक क्रिया आजही शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असताना शेतकऱ्यांकडे असलेले अत्यल्प जमिनीचे प्रमाण व उदासीन कृषी विभाग यामुळे शेतीखालील क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. विविध कारणांनी संक्रमणाच्या कालावधीतून जाणारा खरीप हंगाम पांरपरिक शेती व आधुनिक यंत्रांचा वापर यांच्या दुहेरी संगमातून तालुक्यात पुढे हाकला जात आहे. खरीप हंगामात पारंपरिक पिकात सातत्याने घट होत असताना आंबा, काजू, फणस, कोकम या नगदी उत्पादन देणाऱ्या फळझाडांचे लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून आलेला आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.