पृथ्वीचा विनाश थांबवू शकतो का ?

पृथ्वीचा विनाश थांबवू शकतो का ?

Published on

rat29p10.jpg-
73965
डॉ. प्रशांत परांजपे

इंट्रो

कोकणाला निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून असं सौंदर्य बहाल केलेले आहे. मात्र आज दोन्ही हातांनी हे सौंदर्य ओरबाडण्याचे काम विकासाच्या नावाखाली सर्वत्र सुरू आहे. विकास करताना निसर्गाला धोका पोहचणार नाही, याची काळजी घेतली तर खऱ्या अर्थाने कोकणचा विकास होईल. याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवणे अत्यावश्यक आहे...!
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.

पृथ्वीचा विनाश थांबवू शकतो का ?

समुद्राने आता आपली जागा सोडून जमिनीकडे कूच सुरू केली आहे. एका बाजूने हिमालय वितळतो आहे. दुसऱ्या बाजूने मृत समुद्र आपली जागा सोडतो आहे. किंबहुना २०५० पर्यंत मृत समुद्र तरी शिल्लक राहील का, अशी भीती समोर आली आहे. आज ४० ते ५० अंश सेल्सिअस तापमान झाले की अंगाची लाही लाही होते. मानवासहीत वन्यजीवही उष्माघाताचे बळी पडत आहेत. उद्या हेच तापमान ५० ते ६० अंशापर्यंत गेलं तर मानवाला आणि सजीव सृष्टीला या भूतलावर जिवंत राहणं केवळ अशक्य आहे.
नुकतेच समुद्रकिनारी जे ओअरफिश सारखे महाकाय मासे मरून किनाऱ्यावर येऊ लागू लागले आहेत. ते समुद्राच्या सखोल भागातील पाण्याच्या पातळीमधील हवामान बदलाचा परिणाम आहे. कारण हे महाकाय मासे समुद्राच्या थंड पाण्यात राहतात. ज्या ठिकाणी सुमारे ६०० फुटाच्या खाली समुद्राचे जे थंड पाणी असते, त्या ठिकाणी हे मासे राहतात. त्याचवेळी ते वरती येतात, ज्यावेळी त्यांना आपले जीवन संपवावे लागते किंवा जीवन संपते किंवा समुद्र तळाशी प्रचंड उलथापालथ होते. ती ज्वालामुखीच्या स्वरूपात असेल किंवा पाण्याचं कायमस्वरूपी तापमान बदलत चालल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर होणारा परिणाम असेल. मोठा मासा गळाला लागला म्हणून आनंद होण्याचे कोणतीही कारण नाही. कारण की धोक्याची तिसरी घंटा आहे. सर्व बाजूंनी निसर्ग कोपत असताना पर्यावरणाच्या शाश्वत संवर्धनाची अत्यंत निकडीची गरज आहे. याकरता प्रथम शासनाने कोकणात महाकाय रासायनिक प्रकल्प आणण्याचे दिवास्वप्नं न पाहता कोकणातील साधन संपत्तीवर आधारित जे म्हणून उद्योग आहेत. त्यांच्या उभारणी करता निधी उपलब्धता, सबसिडी, सवलती जमीन, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे.
शाश्वतते समवेत धोरणात्मक घोषणा करताना शासनस्तरावर देवराईमधील मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा विचार करण्याचे काम सुरू आहे. या देवराईतच निसर्ग मंदिर लपले आहे. त्याचाही जिर्णोद्धार करून धोरणात्मक उपाययोजना करताना गाव तिथे देवराई आणि गाव तिथे निसर्ग मंदिर उभं करणं अत्यावश्यक गोष्ट निर्माण झाली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासमवेतच हरितमय आणि सकस जमिनीचं सुजलाम सुफलाम असं रूपड तयार करण्याकरता धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक बाब झाली आहे. कोकणामध्ये जे काही आता रासायनिक प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळे होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाची कारणमीमांसा ही प्रत्येकाने आपापल्यास्तरावर केली पाहिजे. शासनाने धोरणात्मक निर्णय घेताना प्रकल्प शाश्वत पर्यावरण विकासावर आधारित असणे अत्यावश्यक गोष्ट आहे, हे प्रकर्षाने लक्षात घ्यावे. कोकणाला निसर्ग देवतेने दोन्ही हातांनी भरभरून असं सौंदर्य बहाल केलं आहे मात्र आज दोन्ही हातांनी हे सौंदर्य ओरबाडण्याचे काम विकासाच्या नावाखाली सर्वत्र सुरू आहे. कुठेही विकास करायचा म्हटलं की पहिली कुऱ्हाड मारली जाते ती झाडांच्या मुळावर. झाड किती वर्षाचे आहे किंवा ते झाड ठेवून आपल्याला विकास करता येईल का हा विचारही कुठेही रुजलेला नाही. त्यामुळे आज दुर्दैवानं ही कुऱ्हाड आपल्याच पायावर पडू लागली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळून मानवी वस्ती ही पृथ्वीच्या पोटात नाहीशी होत आहे.
ज्या पद्धतीने निसर्गावर आपण अत्याचार सुरू केले आहेत आधी मुलांमध्ये गड किल्ल्यांनी दऱ्याखोऱ्यांवर प्लास्टिकचा जो काही आपण भडीमार्ग सुरू केला आहे त्याला रोखणं येतात अत्यंत आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक ग्रामस्तरावर अर्थात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत जे कायदे नियम येतात त्याची १०० टक्के काटेकोर अंमलबजावणी होणं काळाची गरज आहे आणि याकरता प्रत्येक नागरिकांनी सकारात्मक विचार करता पुढे गरजेचे आहे.
मी फक्त माझा संसार, माझी मुलं धमाल मस्ती यामध्येच न अडकता मी या समाजाचा या निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्याचा सांभाळ करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे ही भावना मनात रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण पृथ्वीच्या ढासळलेल्या वातावरणाला पुनर्प्रस्थापित करण्यात यशस्वी होऊ.

* कोणत्या पातळीवर काम करावं लागेल

पृथ्वीचा विनाश वाचवायचा असेल तर शाळा, महाविद्यालय, शासकीय ,निमशासकीय कार्यालय, तंत्र विद्यालय त्याचप्रमाणे सर्व आयटी विभागातील कंपन्या, रासायनिक कारखाने, इतर छोटे-मोठे उद्योग या सर्वांचा कृतीत्मक सहभाग अत्यावश्यक आहे. रासायनिक प्रकल्प कोकणात सुरू झाले त्यामुळे आजची स्थिती काय आहे? ज्या ठिकाणी रासायनिक प्रकल्प उभे आहेत तेथील तेथील नदी, नाले, वायू प्रदूषण, नागरिकांच्या प्रकृतीवर होणारे परिणाम, निसर्गाच्या प्रकृतीवर होणारे परिणाम याचा अभ्यास हा शासनाने करावा. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी करावा म्हणजे विकास कशा पद्धतीने करायचा याचे उत्तर स्वतःलाच आपणहून मिळेल. कारण विकास करताना निसर्गाच्या संरक्षणार्थ कोणतीही उपायोजना न केल्यामुळेच आज आपल्या पायावर कुऱ्हाड मारली जात असल्याचे प्रत्यंतर रासायनिक कारखाने किंबहुना अनेक होणाऱ्या विकास कामांमधून समोर येत आहेत. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात ६०० एकर वर महाएमआयडीसी चा प्रस्ताव तयार होत असून या एमआयडीसीमध्ये जे उद्योग येतील त्या उद्योगांच्या मुळे निसर्गाला, मानवाला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी ही शासन प्रशासन आणि उद्योजक या सर्वांनी घेणे गरजेचे आहे आणि या सर्वांचं प्रबोधन होणे ही तितकच महत्त्वाची गोष्ट आहे. आता विनाश सुरू झाला आहे. त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या शाश्वत विकासाकरिता प्रत्येक नागरिकासह, शासन आणि प्रशासनानं कंबर कसणे ही काळाची गरज आहे .अन्यथा आपली कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही.

(लेखक शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com