भाताची आदिम बियाणी

भाताची आदिम बियाणी

Published on

जपूया बीज वारसा---------लोगो

rat30p3.jpg-
74122
कुणाल अणेराव

इंट्रो
सगळेच नवीन तांदूळ शिजवताना चिकट असले तरी यातील छोट्या आकाराचे दाणे हे मुख्यत: चिकट भात होणारे असतात तर लांब दाणे हे मोकळे शिजतात. ‘अमायलोज’ हा पिष्टमय पदार्थातील घटक जास्त असेल तो भात चिकट शिजतो तसेच जर कमी असेल तर भात मोकळा होतो. त्याचबरोबर शिजलेल्या भाताचा पारदर्शकपणा, प्रमाणबद्धता, शिजण्यास लागणारी वेळ हे देखील अमायलोजचे प्रमाण ठरवते.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था

-----
भाताची आदिम बियाणी

भाताची शेती करण्यासाठी टरफलं असलेले दाणे वापरले जातात. भातशेती ही मुख्यत: खरीप हंगामात केली जाते. प्रथम गादीवाफा करून भाताची रोपे तयार करण्यात येतात. त्यानंतर साधारणत: २० दिवसांनी ही रोपे चिखलणी केलेल्या शेतात पुन्हा लावली जातात. पुढे सहा ते दहा आठवड्यांनी तांदळाला फुले यायला सुरवात होते. कोकणात याला भात पसवला असे म्हटले जाते. भाताच्या फुलात स्वपरागण होते कारण, एकाच फुलामध्ये नर व मादी अशी दोन्ही प्रजननाची अंगे असतात. परागण झाल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांत फुलांपासून भाताचे दाणे तयार होतात. या साळी शुष्क, एकबीजी आणि न तडकणाऱ्या असतात. साळीवर सालीसारखे आवरण (तूस) असते. तुसाखाली कोंड्याचा स्तर आणि भ्रूण असतो. साळीचा मधला भाग स्टार्चयुक्त असतो. हाच भाग भात म्हणून खाल्ला जातो. तूस आणि कोंड्याचा स्तर काढून टाकलेल्या भाताला सडीचा भात किंवा पॉलिश्ड राइस म्हणतात. काही ठिकाणी भातावरील फक्त तुसे काढून टाकलेली असतात. अशा भाताच्या दाण्यांचा रंग किंचित लालसर असतो. त्याला असडीचा भात किंवा ब्राउन राइस म्हणतात. असडीचा भात पांढऱ्या भातापेक्षा पौष्टिक असतो कारण, त्यात अनेक पौष्टिक घटकांनी युक्त असा कोंडा शाबूत असतो. भाताच्या तुसामध्ये १५ ते २० टक्के तेल असते. त्यापासून खाद्यतेल मिळवतात, त्याला राईस ब्रान ऑईल म्हणतात.
तांदळाचा मुख्य उपयोग शिजवून भात म्हणून खाण्यासाठी केला जातो त्याशिवाय विविध खाद्यउद्योग जसे की, सूप, लहान मुलांचे अन्न, आईस्क्रीम इत्यादी बनवणे यासाठी तांदळाचा स्टार्च वापरतात. तांदळापासून चीनमध्ये बिअर, वाइन इ. आणि जपानमध्ये साके ही मद्ये बनवतात. भारतातही हिमाचल प्रदेशात तांदळापासून मद्य तयार करतात.
भाताच्या १०० ग्रॅ. सेवनातून ८० ग्रॅ. कर्बोदके, ७ ग्रॅ. प्रथिने आणि याशिवाय ब-समुहातील जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसयुक्त खनिजे मिळतात. भातापासून मोठ्या प्रमाणात कर्बोदके मिळत असल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महिला आणि मुख्यत: लहान मुलांमध्ये रक्तक्षय, थॅलेसेमिया, सिकल सेल यासारखे गंभीर आजार दिसून आले आहेत. यावर उपाययोजना म्हणून रेशनवर मिळणाऱ्या एक किलो तांदळात १० ग्राम फोर्टिफाईड तांदूळ मिसळले जातात. यात जीवनसत्त्व अ, ब वर्गातील जीवनसत्त्वे, झिंक, फॉलिक अॅसिडसारखी सूक्ष्म पोषकतत्त्वे घालून तांदळाचे दाणे तयार केले जातात.
भारतात एक लाखाच्या वर भाताच्या वाणाची विविधता होती; मात्र आता त्यातील अनेक वाण नष्ट झाले आहेत. याची सुरवात इंग्रजांच्या काळातच झाली. सारा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस, ऊस, चहा, कॉफी, ताग, तंबाखू, अफू, नीळसारख्या नगदी पिकांची लागवड करायला सुरवात केली होती. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वारंवार दुष्काळ आणि शेतीची कमी झालेली उत्पादकता यामुळे देशावर आर्थिक अस्थिरता आणि भूकमारीची वेळ आली. यावर उपाय म्हणून हरितक्रांतीची योजना पुढे आली. यामध्ये बियाणांचे सुधारित वाण, रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून मोठ्या प्रमाणावर धान्य उत्पादन केले गेले. यात मुख्यत: गहू आणि तांदूळ यांचा समावेश होता. हेच मोठ्या प्रमाणावर पिकवलेले धान्य पुढे रेशनच्या दुकानांवर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवले जायचे. हरितक्रांती ही त्या काळाची गरज होती;मात्र यामुळे संपूर्ण देशाचे अन्न एकसारखे होऊन गेले. अन्नातील स्थानिक विविधता नष्ट झाली. यात तांदळाचे कित्येक स्थानिक वाण नष्ट झाले. तांदळाच्या विविध प्रजातींची माहिती घेऊया, पुढील भागात.

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com