गावतळे -प्रो गोविंदा स्पर्धेसाठी हिंदूराज गोविंदा पथक पात्र

गावतळे -प्रो गोविंदा स्पर्धेसाठी हिंदूराज गोविंदा पथक पात्र

Published on

प्रो गोविंदा स्पर्धेसाठी हिंदूराज गोविंदा पथक पात्र
प्राथमिक फेरीत आठवा क्रमांक; यंदाची अंतिम फेरी सात ऑगस्ट रोजी
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ३० ः मुंबई येथे झालेल्या प्रो गोविंदा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दापोली तालुक्यातील जालगाव येथील हिंदूराज गोविंदा पथकाने आठवा क्रमांक पटकावला असून, अंतिम फेरीसह गोल्डन तिकीट मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे सलग तीन वर्षे प्रो गोविंदा स्पर्धेतील त्यांचे स्थान निश्चित झाले आहे. यावर्षीची अंतिम फेरी सात ते नऊ ऑगस्ट रोजी वरळी येथे होणार आहे.
मुंबईत झालेल्या प्राथमिक फेरीत हिंदूराज गोविंदा पथकाने ३८.१७ सेकंदात सात थर लावून कोणताही प्रमाद (फाऊल) न करता सर्व थर सुखरूप खाली उतरवले. त्यामुळे या पथकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. हे यश संपादन केल्यामुळे दापोली, खेड, मंडणगडचे आमदार राज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्वांचे अभिनंदन केले. योगेश कदम यांनी हिंदूराज गोविंदा पथकाची मुंबई येथे राहण्याची उत्तम सोय केली आहे. त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष मयूर मोहिते यांनी आभार मानले.
प्रो गोविंदा पर्व तीन या स्पर्धेसाठी हिंदूराज गोविंदा पथकाचे अध्यक्ष मयूर मोहिते, उपाध्यक्ष महेश राळे, प्रशिक्षक महेंद्र धाडवे, अमित रजपूत, व्यवस्थापक रोहन केळस्कर यांनी रात्रंदिवस पाऊस पाण्यात गोविंदा पथकाचा सराव घेतला आहे. हिंदूराज गोविंदा पथकाचे सल्लागार राकेश भांबिड, ओंकार साळवी, सुयश भुवड, सुजय दवंडे, दिप्तेश गुजर, पराग मोहिते तसेच सभासद व सदस्य रचित पटेल, चिराग मोहिते, महेश धाडवे, स्वप्नील राळे, सौरभ मोहिते, अविनाश जाधव यांचीही मोलाची भूमिका या यशासाठी महत्त्वाची ठरली.
हिंदूराज गोविंदा पथकातील सर्वात वरच्या थराला असलेल्या गोविंदांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. त्यामध्ये सहभागी असलेले आर्यन सकपाळ (सातवा थर), कुणाल भुवड (सहावा थर) आणि त्या दोघांना आपल्या खांद्यावर घेऊन पाचव्या थराला असलेल्या विशाल शिंदे यांचेही विशेष कौतुक केले आहे. जिल्ह्यातील एक नामांकित गोविंदा पथक असून, दापोली प्रो गोविंदामध्ये २०२३ ला विजेता व २०२४ ला उपविजेता ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com