पुणे उपआयुक्तपदी रावले यांची बदली

पुणे उपआयुक्तपदी रावले यांची बदली

Published on

22563

पुणे उपआयुक्तपदी
रावले यांची बदली
ओरोस ः अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांची पुणे शहर उपआयुक्त पदावर बदली झाली. नोव्हेंबर २०२३ पासून ते या पदावर कार्यरत होते. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेनुसार सिंधुदुर्गला संपूर्ण राज्यात एक नंबरचा ‘एआय’युक्त जिल्हा बनविण्यास त्यांनी योगदान दिले होते. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या रजा कालावधीत त्यांनी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली होती. शासनाने २७ जूनला प्रशासकीय कारणास्तव पोलिस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदली प्रक्रियेत रावले यांची पुणे शहर पोलिस उपआयुक्त पदावर बदली केली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने अपर पोलिस अधीक्षक पद तूर्त रिक्त राहिले आहे.
----
विद्यामंदिरला
बालसाहित्य भेट
कणकवली ः विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत वाचन संस्कार विकसित करण्यासाठी किशोरवयीन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी ग्रंथ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. मूल्यसंस्कारांनी युक्त असलेले बालसाहित्य चैतन्य सृजन व सेवा संस्था संचलित मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडामार्फत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला बालसाहित्य सस्नेह भेट देऊन बालकांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी वाचन चळवळ मुलांमध्ये रुजविण्यासाठी ग्रंथांचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक श्री. वणवे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेचे ग्रंथपाल महानंद पवार यांनी ऋग्वेद संस्थेचे आभार मानले.
---
मालवण तालुक्यात
रोग नियंत्रणाचे धडे
मालवण ः राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील हिवताप व हत्तीरोग विभाग कर्मचाऱ्यांनी टोपीवाला हायस्कूल व जिल्हा परिषद शाळांमध्ये हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया व हत्तीरोगविषयी माहिती दिली. आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत, कर्मचारी एस. ए. चांदोस्कर, आर. बी. साखरे यांनी मार्गदर्शन केले.
.....................
अ‍ॅड. खटावकरांना
‘पी.एचडी’ जाहीर
मालवण ः आनंदी लॉ कॉलेजच्या इन्चार्ज प्रिन्सिपल तालुक्यातील कट्टा गावच्या सुकन्या अ‍ॅड. संपदा खटावकर पिसे यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एचडी पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी ‘इक्वल जस्टीस अँड फी लीगल एड टू द पूअर विथ स्पेशल रेफन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोशिवो लिगल स्टडी’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. यासाठी त्यांना डॉ. नारायण रायदुर्ग (माजी प्राचार्य, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. याबाबत त्यांचे कौतुक केले जात आहे.
.....................
रेडी परिसरात
विजेचा लपंडाव
सावंतवाडी ः रेडी गावात सध्या विजेचा लपंडाव सुरू असून, विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराबाबत घरगुती वीज ग्राहकांसह व्यावसायिक वीज ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवकाळी पावसावेळी वीज पूर्णपणे आठवडाभर गायब होती. त्यामुळे रेडी गाव अंधारात होता. त्यानंतर आता सतत गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. तो अद्याप बंद झालेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांची फारच गैरसोय झाली आहे. विद्युत वितरण कंपनीने याची दखल घेऊन वीज सेवेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहक व व्यावसायिक वीज ग्राहकांतून होत आहे.
.....................
‘एसएसपीएम’ला
केसवेकरांची भेट
कणकवली ः एसएसपीएम महाविद्यालय इंडियन अभियांत्रिकी येथे वर्किंग इन एम्बसी, व्हिएतनाम आणि सिलिकॉन गपर्शशी, युएसएचे वीन टॉन तसेच टास्क फोर्स इन्चार्ज एमएसएमई प्रथमेश केसवेकर यांनी सदिच्छा भेट दिली. वीन टॉन यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफक्चरिंग, पीसीबी डिझाईन आणि मॅन्युफक्चरिंग’ या विषयावर विद्यार्थी, प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. तांत्रिक ट्रेंड्स, इलेक्ट्रॉनिक उत्पादन प्रक्रियेतील नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि स्टार्टअप संधींबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी त्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com