रत्नागिरी ः चार महिन्यात रत्नागिरी आगाराला मिळाले दीड कोटी
rat30p8.jpg-
74145
एसटी बसचा संग्रहित फोटो.
रत्नागिरी आगाराला मिळाले
चार महिन्यात दीड कोटी
भाडेवाढीचा फायदा; ग्रामीण भागांसाठी आजही महत्व
ंंंंंंंंंंंसकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०ः एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ केल्यामुळे रत्नागिरी एसटी आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. चार महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न रत्नागिरी आगाराला मिळाले आहे.
राज्याच्या शहरासह ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे; मात्र मागील कित्येक वर्षापासून एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे तसेच डिझेल, चेसिस, टायर यांसह इतर कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने सर्व प्रकारच्या सेवांमध्ये २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. राज्यासह विविध जिल्हाभरात सर्वसामान्य प्रवासी तसेच विविध संघटनेच्यावतीने मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. महामंडळाने भाडेवाढ मागे न घेता सुरू ठेवली. यामुळे रत्नागिरी आगार मालामाल झाले असून, दीड कोटींचे उत्पन्न वाढले असल्याचे सांगण्यात आले. पूर्वी दिवसाला ९ लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता ११ लाखाचे उत्पन्न मिळत आहे. जवळचा प्रवास केल्यास १० ते २५ रुपयांचा तर लांब पल्ल्याच्या गाडीचा प्रवास केल्यास १०० ते १५० रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्यावतीने विविध कारणांसाठी एसटी तिकिटांच्या दरात वाढ केल्यामुळे रत्नागिरीसह आठ आगारांना फायदा झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे.
दरम्यान, आजही ग्रामीण भागात लालपरीचे महत्व टिकून आहे. मुख्य गावांच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी ग्रामस्थांकडून एसटी बसला प्राधान्य दिले जात आहे.
चौकट
लांब पल्ल्याचे तिकीटदर
रत्नागिरी ते मुंबई - ६०४ रुपये, रत्नागिरी - बोरिवली - ६३९, रत्नागिरी - पुणे ५४९, ६९५, रत्नागिरी - तुळजापूर-७५०, रत्नागिरी - अक्कलकोट - ७५० तर लांजा - धाराशिव - ६६० असे लांब पल्ल्यांच्या एसटीचे वाढलेले दर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.