मंडणगड-बाणकोट- वेळास रस्त्याची दुर्दशा, वाहतुकीवर परिणाम

मंडणगड-बाणकोट- वेळास रस्त्याची दुर्दशा, वाहतुकीवर परिणाम

Published on

ग्राऊंड रिपोर्ट-----लोगो

rat30p12.jpg-
74152
वेळास ः समुद्राला उधाण आल्यानंतर लाटांसोबत रस्तावर साचलेला कचरा व घाण.
rat30p13.jpg-
74153
वेळास ः कचऱ्याचा अडथळा आणि पाणी यातून मार्ग काढत अशी वाहने ढकलत आणावी लागतात.
rat30p14.jpg-
74154
वेळास ः भरतीमुळे किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटा.
-----------

उधाणात वाहून जातोय
बाणकोट - वेळास रस्ता
वाहतुकीवर परिणाम; कचऱ्याचे साम्राज्य, उपाययोजनांची आवश्यकता
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३०ः खवळलेल्या समुद्रामुळे उधाणाच्या लाटांनी बाणकोट-वेळास या प्रमुख राज्यमार्ग क्र. ४ ची दुरवस्था झाली आहे. हा प्रकार वारंवार होत आहे. हे टाळण्यासाठी किनारीभागात संरक्षण भिंत, धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या उधाणामुळे हा मार्ग पूर्णतः बंद झाला होता. लाटांमधून मार्गक्रमण करणे जीवावर बेतणारे ठरू शकते. या मार्गाची सात वर्षांपूर्वी दुरुस्ती केली होती. आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर केला आहे.
मागील आठवड्यात आलेल्या उधाणामुळे वेळासकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून, संपर्कही तुटलेला आहे. अरबी सुमद्राला वेळोवेळी येणाऱ्या उधाणामुळे या रस्त्याचीही दुरवस्था झालेली आहे. ग्रामस्थांना जीव मुठीत धरून पायी चालत जावे लागत आहे. बाणकोटपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वेळास गाव आहे. या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता समुद्रकिनाऱ्यावरून जातो. किनारा संपताच सुरू होणारा डोंगर मोठा आहे. परिणामी, रस्त्याची त्या काळात करण्यात आलेली बांधणी ही समुद्रकिनाऱ्यावरून झाली. रस्त्याच्या काही अंतरात बांधण्यात आलेल्या संरक्षक भितींचेही दरवर्षीच्या पावसात नुकसान होते. उधाणामुळे समुद्राचे पाणी रस्त्यावर आल्याने समुद्रातील घाण रस्त्यावर साठून वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. पावसात या मार्गावरील रस्ता अनेकवेळा बंद होत असल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क वारंवार खंडित होत असतो. बंद रस्त्यांमुळे एसटी गाड्या गावात जात नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची अडचण होते. स्थानिक नागरिकांना याची सवय असली, तरीही पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

चौकट १
पर्यटन बहरत असताना सुविधांची वानवा
पर्यटकांच्या सर्वाधिक पसंती उतरलेले मंडणगड तालुक्यातील वेळास हे गाव आहे. या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच कासव संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरणस्नेही गाव जगाच्या नकाशावर आले. तालुक्याच्या पर्यटन विकास आराखाड्यात या गावाचे भूमिका महत्वाची मानली जाते; मात्र पायाभूत सुविधांकरिताही या गावाला आजही झगडावे लागत आहे. सध्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याला पूर्ण अंतरात सरंक्षक भिंती असाव्यात, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आहे; मात्र बांधकाम विभाग त्याकडे लक्ष देत नाही. समुद्राच्या लांटामुळे जुन्या भिंतीचेही दरवर्षी नुकसान होते व वाहतूक बंद ठेवावी लागते. याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

चौकट २
सागरी महामार्ग हाच पर्याय
बाणकोटपासून वेळासला जोडणारा हा रस्ता समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरून जाणार आहे. सावित्री खाडी जिथे समाप्त होते आणि जेथून समुद्राचा भाग सुरू होतो, त्याठिकाणी हा रस्ता उभारला जाणार आहे. सुमारे तीन किमी पेक्षा अधिक असणारा मार्ग वेळास गावाला जोडण्यात येणार आहे. याच ठिकाणी श्रीवर्धन (बागमांडला) आणि मंडणगड (बाणकोट) तालुक्याला जोडणारा सागरी सेतू होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड असल्यामुळे वेळासचे महत्त्व वाढणार आहे. हा विचार करून येथील रस्ता नव्याने बांधणे गरजेचे आहे.

चौकट ३
अंतर आणि वेळ वाढवणारे पर्यायी मार्ग
उधाणावेळी रस्ता बंद झाल्यास या मार्गाला पर्याय म्हणून उमरोली, केळशीफाटा, चिंचघर मार्गाने केळशीहून वेळासला जाता येते तसेच वेळासवासीयांना चिंचघर-आंबवली-साखरीमार्गे गावात यावे लागते; मात्र हे दोन्ही पर्याय पर्यटक आणि वेळासवासीयांना अंतर आणि वेळ वाढवणारे आहेत.

कोट १
पावसात वारंवार रस्ता वाहतुकीसाठी बंद होत असल्यामुळे गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरी व शासकीय कामासाठी तालुक्याला जाणारे नागरिक, रुग्ण, बँकिंग व जीवनावश्यक वस्तूंचे खरेदीसाठी अन्यत्र जाणारे या सर्वांच्या अडचणीमुळे मोठे हाल होत आहेत. संबंधित यंत्रणेने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- बापूसाहेब सोमण, ग्रामस्थ

कोट २
समुद्राला आलेल्या उधाणाचा वेळास गावाला नेहमीच फटका बसतो. रस्त्याच्या या अवस्थेमुळे पर्यटन व्यवसायाला खीळ बसते. या मार्गावर पतन विभागामार्फत धूपप्रतिबंधक बंधारा बांधून समस्या दूर करणे अत्यावश्यक आहे.
- हेमंत सालदूरकर, वेळास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com