गावतळे- हरिद्वार ते केदारनाथचा ६०० किमी सायकल प्रवास थरारक

गावतळे- हरिद्वार ते केदारनाथचा ६०० किमी सायकल प्रवास थरारक

Published on

rat30p17.jpg-
74163
केदारनाथ ः हरिद्वार ते केदारनाथ असा ६०० कि.मी.चा सायकल प्रवास करणारे सायकलस्वार.
---------
हरिद्वार ते केदारनाथचा थरारक सायकल प्रवास
दापोलीतील दोघे स्वार; सायकल चालवा, निरोगी राहण्याचा दिला संदेश
अशोक चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ३० ः दापोली सायकलिंग क्लबचे दोघेजण आणि मुंबईतील एकूण ८ सायकलस्वारांनी हरिद्वार ते केदारनाथ अशी ६०० किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. हा अनुभव बरेच काही शिकवणारा होता. कच्च्या रस्त्यावर सायकल चालवताना अन् सर्वाधिक उंचीवर श्वास घेताना स्वारांचा कस लागला. सायकलने प्रवास करा, निरोगी राहा, असा संदेश यावेळी सायकलवीरांनी दिला.
हिंदूंच्या चार पवित्र अशा धामांपैकी एक असलेलं केदारनाथ हे सर्वात उंचीवर वसलेलं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडमधील रूद्रप्रयाग जिल्ह्यात असून, मंदिर समुद्रसपाटीपासून ३५८४ मीटर उंचीवर हिमालयातील गढवाल प्रदेशामध्ये येतं. येथे पोहोचण्यासाठी १७ कि.मी.चे खडतर ट्रेकिंग करावं लागते. या सायकलवीरांनी १२ ते २४ जून या कालावधीत हरिद्वार ते केदारनाथ हा ६००हून अधिक किमीचा सायकल प्रवास केला.
केदारनाथ आणि इतर अनेक धार्मिक, आध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या. सायकलप्रवासात पुरेल एवढे साहित्य प्रत्येकाने आपापल्या सायकलवर घेतले होते. त्यासाठी कोणतेही वेगळे वाहन वापरण्यात आलेले नाही. या प्रवासात दापोली सायकलिंग क्लबचे अंबरिश गुरव, शरद भुवड तसेच मुंबईतील सतीश जाधव (वय ६८), विजय कांबळे, विशांत नवार, नवनीत वरळीकर, विकास कोळी, आदित्य दास सहभागी झाले होते.

चौकट १
या ठिकाणांना दिल्या भेटी
शेकडो कि.मी.च्या सायकल प्रवासात या सायकलिस्टनी हरिद्वार, ऋषिकेश, शिवपुरी, देवप्रयाग, रूद्रप्रयाग, सोनप्रयाग, कीर्तीनगर, गुप्तकाशी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर, महाकवी कालिदास यांना विद्या प्राप्त झालेले महाकाली मंदिर कालीमठ या ठिकाणांना भेट दिली तसेच हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद झाल्यावर देवाच्या मूर्ती ज्या ठिकाणी आणल्या जातात ते उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर, अगस्त्य ऋषींची तपोभूमी, अगस्त्यमुनी, गौरीकुंड, केदारनाथ धाम आदी शंकराचार्य समाधी, शिवपार्वती यांचे लग्न झालेले ठिकाण त्रियुगी नारायण, धारीदेवी मंदिर श्रीनगर इत्यादी अनेक ठिकाणे पाहिली. गंगानदीत रिव्हर राफ्टिंग पण त्यांनी केले. अनेक स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

कोट
देवभूमी हिमालयातील उत्तराखंड गढवाल भागातील डोंगर निसर्ग अनुभवत, गंगा, अलकनंदा, मंदाकिनी नदीच्या किनाऱ्याने सायकल चालवणे खूपच आव्हानात्मक आहे. रस्त्यावर आलेल्या दरडी, त्यामुळे झालेली वाहतूककोंडी, थंडी, वारा, पाऊस, न संपणारे घाटरस्ते, तीव्र चढ-उतार, मार्गावरील चिखल, बर्फाचे ग्लॅशिअर अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. हिमालयात सायकल चालवण्याचा अनुभव येथे कामी आला. पथकाचा सराव, एकजूट आणि मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून झालेले स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी, निसर्गाची अपार सुंदरता, आध्यात्मिक वातावरण यामुळे ही सायकल यात्रा संस्मरणीय ठरली. पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व आम्ही पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता.
- अंबरिश गुरव, दापोली सायकलिंग क्लब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com