देवगडमध्ये वेलींच्या विळख्यात पथदीपच गायब

देवगडमध्ये वेलींच्या विळख्यात पथदीपच गायब

Published on

74195

वेलींच्या विळख्यात पथदीपच गायब

असून नसल्यासारखेच; देवगडमधील समस्येकडे महावितरणचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः सध्या पावसाळ्यामुळे येथील शहरातील विद्युत खांबावर वेली चढत असल्याने धेाकादायक बनले आहे. रात्रीच्यावेळी खांबावरील पथदीपांचा प्रकाशही यामुळे पूर्णक्षमतेने खाली पडत नाही. विद्युत भारीत लोखंडी खांबावर वेली असल्याने खाली विजेचा धक्का बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. याबाबत येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
येथील शहरातील विविध भागात सध्या पावसामुळे झाडी वाढली आहे. रिकाम्या जागेत रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर वेली चढून खांबाला पूर्णपणे वेढल्याचे काही भागात चित्र आहे. काही वस्तीमधील विद्युत खांबावर अशाप्रकारे वेली चढल्या असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विद्युत लोखंडी खांब वाहत्या पाण्याजवळ आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने पाणी वाहत असते. तसेच रस्त्याकडेला गवत वाढले आहे. परिसरात गुरे चरत असल्याने विद्युत भारीत खांबाला स्पर्श होऊन गुरे दगावू शकतात. तसेच शाळकरी मुलांसह नागरिक या भागातून सतत ये-जा करीत असतात. अशावेळी मोठी दुर्घटना घडू शकते.
--------
अधिकारी लक्ष देणार का?
खांबावर विद्युत पथदीप आहेत. मात्र, खांब वेलींनी वेढलेले असल्याने पथदीपांचा प्रकाश खाली पडत नाही. सध्या सरपटणाऱ्या जनावरांचा वावर असतो. यासाठी पथदीप आवश्यक ठरतात. मात्र, पथदीप सुरू असले तरीही वेलींमुळे त्याचा प्रकाश पूर्णक्षमतेने खाली पडत नाही. अशा धोकादायक बनलेल्या विद्युत खांबाबाबत येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. याकडे महावितरणचे कार्यकारी अभियंता लक्ष देणार का? अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com