लोटे-चिरणी-आंबडस मार्गावर 6 महिन्यात दोन बळी

लोटे-चिरणी-आंबडस मार्गावर 6 महिन्यात दोन बळी
Published on

‘लोटे-चिरणी-आंबडस’वर दोघांचा मृत्यू
सहा महिन्यातील चित्र ; अपघातात वाढ, मार्गावरील झाडाझुडपांची भर
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १ : तालुक्यातील लोटे-चिरणी-आंबडस रस्त्यालगत असणारी झाडेझुडपे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. या मार्गावर गत सहा महिन्यात झालेल्या अपघातात दोन बळी गेले आहेत. संबंधित ठेकेदार व पंतप्रधान ग्रामसडक कार्यालय याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
परशुराम घाटात अपघात अथवा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास पर्याय रस्ता म्हणून चिरणी-लोटे-आंबडस रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता कळबंस्तेमार्गे चिपळूणकडे जाण्यासाठी सोयीचा ठरत आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारांनी दोन वर्षांपूर्वी पूर्ण केले असले तरी अजूनही साईटपट्ट्या व गटार व्यवस्था नाही तसेच रस्त्यालगत झाडेझुडपे असल्याने घाटात समोर येणारे वाहन न दिसल्यामुळे मोठे अपघात होत आहेत.‌ माजी उपसभापती तसेच शिवसेना तालुकाप्रमुख मोहन आंब्रे यांना दुचाकी अपघातात प्राण गमवावा लागला. तसेच चार महिन्यापूर्वी लोटे येथील घर बांधणारे ठेकेदार येळवी यांनाही प्राण गमावावा लागला होता. अनेक अपघात रस्त्यावर सातत्याने होत असूनही संबंधित ठेकेदार मात्र दुर्लक्ष करत आहेत. गटारव्यवस्था न केल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने साईटपट्ट्या खचल्या आहेत. दरम्यान, या रस्त्यावर लोटे एमआयडीसीतील कामगारांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तसेच वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची वेळीच दुरुस्ती करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी जोर धरत असून चिरणी, आंबडस तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com