सावडाव धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ

सावडाव धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ

Published on

swt114.jpg
74505
सावडाव ः येथील धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी होत असलेली गर्दी.
swt115.jpg
74506
सावडाव धबधब्याचे प्रवेशद्वार.
swt116.jpg
74507
फेसाळून वाहणारा सावडाव धबधबा.

सावडाव धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ
सोयी सुविधांमुळे पर्यटकांमधून समाधान ः विकेंडसह अन्य दिवशी तुफान गर्दी
पल्लवी सावंत ः सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १ ः येथील सावडाव धबधब्यावर वर्षा पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवार व सुटीच्या, तर हा धबधबा हाऊसफुल्ल होतो. झाडा, वेलींनी आणि हिरव्या गर्द वनराईने नटलेल्या हा धबधबा पर्यटकांना भुरळ घालत असून, गेल्या काही वर्षांत झालेल्या सोयी -सुविधांमुळे पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणारा कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा मेमध्येच प्रवाहित झाला आहे. तेव्हापासून या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची रिघ सुरू आहे. सिंधुरत्न योजनेतून धबधबा परिसर सुशोभित केला आहे. त्यामुळे अधिक मनमोहक दिसत असल्याने पर्यटकांची पावले आपोआप सावडाकडे वळत आहेत. धबधब्याचा नवा लूक पर्यटकांना मोहीत करत आहे. निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा आणि फेसाळ पाणी, अंगावर उडणारे तुषार पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देत आहेत. यावर्षी मॉन्सूनचे मेच्या शेवटच्या आठवड्यात आगमन झाले.
यामुळे सावडावसह जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत.
जिल्ह्यातील आंबोली (ता. सावंतवाडी) नंतर सुरक्षित धबधबा म्हणून वर्षा पर्यटनासाठी सावडाव धबधब्याचे नाव आहे. जिल्ह्यासह राज्यातून व इतर राज्यातील अनेक पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनासाठी सावडावला पसंती देतात. मेपासूनच या धबधब्यावर गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरपर्यत ती कायम असणार आहे. शनिवार व रविवार तसेच सुटीच्या दिवसांसह अन्य दिवशीही या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
गेल्या रविवारी तर सावडाव धबधबा परीसर पूर्णपणे पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला होता. पर्यटकांच्या वाहनांनी परीसर व्यापून गेला होता. या धबधब्याची निर्मिती झाल्यानंतर लोखंडी रॅम्प, पायऱ्या, बाथरूम, टॉयलेट, रस्ता अशा प्रकारे पयाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. आता मात्र मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर पर्यटकांना नाष्टा व जेवणाची सोय व्हावी, यासाठी स्थानिकांनी दुकाने मांडून पर्यटकांची सोय केली आहे. सध्या पाच ते सहा दुकाने मांडून वर्षा पर्यटकांची व्यावसायिक सोय करीत आहेत. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
यंदा पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कणकवली पोलिस स्थानकाच्या वतीने दोन कर्मचारी संरक्षणासाठी नेमले आहेत. सावडाव धबधबा प्रवेशद्वारवर अभ्यंगत ग्रामपंचायतीमार्फत १० रुपये कर आकारला जात आहे. तसेच वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पार्किंगची व्यवस्थेसह पार्किंग करही लावला जात आहे. सावडाव धबधबा ठिकाणी ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजनेतून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असून, सर्व पर्यटकांनी दरवर्षीप्रमाणे स्वच्छता राखत आनंद लुटावा व सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच आर्या वारंग, उपसरंच दत्ता काटे, ग्रामपंचायत अधिकारी मधुरा भुजबळ यांनी केले आहे.

चौकट
‘सिंधुरत्न’तून सौंदर्य खुलले
सावडाव धबधबा हा निसर्गरम्य स्वरचित असल्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. यामुळेच सध्या सिंधुरत्न योजनेतून साठ लाख रूपये खर्च करून धबधब्याचे सुशोभीकरण व पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने पर्यटक समाधनी आहेत. याबाबत अधिक काम प्रगतीपथावर आहे. सध्या सेल्फी पाँईट, स्वागत कमानी, चेंजिंग रूम, बाथरूम, टॉयलेट, परिसरात पेवर ब्लॉक, धबधब्यावर जाण्यासाठी पायऱ्या व रॅम्प, बैठक व्यवस्था, रंगरंगोटी अशी कामे पूर्ण झाली असून, इतर कामे येत्या काळात पूर्ण होणार आहेत.

चौकट
वर्षभर प्रवाहित ठेवण्यासाठी प्रयत्न
सावडाव धबधब्यापासून काही अंतरावर सध्या जलसंधारण विभागाच्या सावडाव धरण प्रकल्पाअंतर्गत काम सुरू असल्याने येत्या काळात हे धरण पूर्ण होणार आहे. यामुळेच पाणीसाठा झाल्याने परिसरातील गावाना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर याच धरणाचे पाणी पुढे सावडाव धबधब्याला वळवण्यात येणार असल्याने नापणे (ता. वैभववाडी) धबधब्याबरोबर सावडाव धबधबा बारमाही पर्यटनासाठी सज्ज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com