वर्दे शाळेचे विद्यार्थी शेत बांधावर
swt123.jpg
74536
वर्देः कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन भात लावणीचा आनंद घेतला.
वर्दे शाळेचे विद्यार्थी शेत बांधावर
कृषी दिनानिमित्त उपक्रमः भात लागवणीचा घेतला आनंद
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ः कृषी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील वर्दे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर उतरत भात लावणीचे धडे घेतले. विद्यार्थ्यांनी नर्सरीमध्ये जाऊन विविध रोपे लागवडीची माहितीही घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना सुपारीच्या झाडाची रोपे वाटप करण्यात आली.
पावसाळा आला की सगळीकडे भाताच्या लावणीची लगबग सुरू होते. मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळावी, यासाठी मोंडकर फार्म वर्दे येथे शाळा क्र. १ च्या तिसरी ते सातवीच्या मुलांनी भेट घेतली. त्यांच्याबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरी गांग-नाईक, उपमुख्याध्यापिका तेजस्वी चव्हाण, नम्रता दयाळ-मेस्त्री, सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
प्रथम शिक्षिका प्रांजल परब यांनी भात लागवडीच्या चारसूत्री पद्धतीची माहिती दिली. त्याचप्रमाणे शेती सेंद्रिय म्हणजे शेणखत, गांडूळ खत, गिरीपुष्प वापरून कशा प्रकारे करायची, याबद्दल मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगण्यात आले. फार्मवर असलेल्या विविध झाडांची माहिती देण्यात आली. त्यानंतर रोपांमध्ये अंतर राखून कशा प्रकारे लावणी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याप्रमाणे मुलांबरोबर शिक्षिका चव्हाण, मेस्त्री व शिक्षक सूर्यवंशी यांनीही लावणी केली.
प्रदीप गर्डी यांनी नर्सरीमधील मोहोगणी, शिसम, कांचन, काजू, आंबा या झाडांची रोपे दाखवून त्यांच्या लागवडीबद्दल माहिती दिली. कृषी दिनाचे औचित्य साधून मुलांना प्रत्येकी एक सुपारीचे रोपटे देण्यात आले. त्यांची कशा प्रकारे लागवड व जोपासना करावी, याची माहिती देण्यात आली. शिक्षक सूर्यवंशी व चव्हाण यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.