गणेश भक्तांकडून शाडूच्या मूर्तींची मागणी

गणेश भक्तांकडून शाडूच्या मूर्तींची मागणी

Published on

-rat२p१८.jpg-
२५N७४७३१
चिपळूण ः कापसाळ येथील कारखान्यात गणेशमूर्ती रंगवताना राजन लवेकर.
---
गणेशभक्तांकडून शाडूच्या मूर्तींची मागणी
चित्रशाळांमध्ये लगबग; थेट दुबईतून नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण पालिकेनेही पीओपी गणेशमूर्तींबाबत कडक धोरण स्वीकारले होते. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी शाडूच्या मूर्तींना चांगली मागणी आहे, अशी माहिती येथील मूर्तिकार देत आहेत. गणरायांच्या आगमनाला दीड महिना राहिला असून, गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. मागील काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्व स्तरांतून सुरू आहे.
गणरायांच्या आगमनाला अवघा महिना राहिला असून, गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. मागील काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्व स्तरांतून सुरू आहे. त्यामुळे भक्तांची पर्यावरणपूरक मूर्तींची मागणीही वाढली आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती, कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाणाऱ्या गणेशमूर्तींकडे भक्तांचा ओढा वाढला आहे.
कापसाळ येथील मूर्तिकार राजन लवेकर मागील अनेक वर्षांपासून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे काम करत आहेत. या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना रत्नागिरी जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, डोंबिवली, पुणे आदी शहरांतून मागणी वाढत आहे. त्यांनी बनवलेल्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बंगलोर आणि थेट दुबईपर्यंत पोचल्या आहेत. नेहमीचे पर्यावरणप्रेमी गणेशभक्त थेट दुबईहून फोन करून मूर्तीचे बुकिंग करतात. १ फूटपासून थेट ३ फूट उंचीच्या गणेशमूर्ती लवेकर यांच्या कारखान्यात तयार आहेत. या मूर्तींची आखणी करण्याची लगबग या कारखान्यात रंगली आहे. शाडूची माती आणि वजनाने अतिशय हलका असणारा कागदाचा लगदा वापरून तयार केलेल्या या मूर्ती वजनाला हलक्या आणि सुबक आहेत. या मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रंगदेखील पर्यावरणपूरक असल्याचे लवेकर यांनी सांगितले. लवेकर यांनी यावर्षी आपल्या कारखान्यात तब्बल ६०० मूर्ती तयार केल्या असून, मे महिन्यापासूनच मूर्तींचे बुकिंग सुरू झाले आहे.
---
कोट
आम्ही शाडू मातीच्या मूर्ती तयार करत आहोत. सरकारने शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन दिल्यास कामगारांना रोजगार मिळेल तसेच पारंपरिक सुरू असलेले कारखाने टिकतील. आम्ही पारंपरिक पद्धतीने गणपतीची षोडशोपचारे पूजा करण्यासाठी ताम्हणातील हाताने बनवलेला सुबक गणपती बनवतो. ताम्हणाच्या आकाराचा पाट करून त्यावर कमळात बसलेली गणेशमूर्ती हे आमचे पेटंट बनले आहे. १ हजारपासून १० रुपयापर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.
- राजन लवेकर, मूर्तिकार, कापसाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com