हुंबरठ विद्यालयात वृक्ष संवर्धनाचे धडे

हुंबरठ विद्यालयात वृक्ष संवर्धनाचे धडे

Published on

swt311.jpg
74993
हुंबरठ ः कृषी दिनानिमित्त शालेय मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हुंबरठ विद्यालयात
वृक्ष संवर्धनाचे धडे
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३ः (कै.) राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट येथील येथील कृषीच्या अंतिम वर्षाच्या कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हुंबरठ येथे कृषी दिवस आणि (कै.) वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्ष दिंडी, वृक्षारोपण, शेतकऱ्यांचा वृक्ष देऊन सत्कार, शेती विषयक नवीन तंत्रज्ञान यांसारखे उपक्रम राबविण्यात आले.
वृक्षारोपणाचे महत्त्व, आधुनिक युगामध्ये वृक्षांचे संगोपन आणि लागवड यासंबंधी माहिती दिली. राज्याच्या कृषी विषयक विविध योजना व कृषी संबंधित डिजिटल अॅप्स यांची माहिती देण्यात आली. हुंबरठ शाळेतील विद्यार्थी व उपस्थित शिक्षकवर्गाच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. सरपंच मनीषा गुरव, उपसरपंच संदीप होळकर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व माजी कृषी सहाय्य्क चंद्रकांत गुरव व कार्यक्रमाला उपस्थित कृषी महाविद्यालय फोंडाघाटचे प्राचार्य श्री. संते, इनचार्ज बगाडे आणि विषय शिक्षण चव्हाण यांच्या सहयोगाने रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमात राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटचे कृषिदूत सुमेधबोधी गोंगले, प्रतीक लोखंडे, राहुल डिगे, तेजस तिकुटे, जितेंद्र पावरा, हर्षद गायकवाड, चेतन गाडे, स्वराज लामखडे, अनिल काकड या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com