गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकरांनी दिला राजीनामा

गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकरांनी दिला राजीनामा

Published on

गणेशगुळे सरपंचांचा राजीनामा
अविश्वास ठरावापूर्वीच माघार; कार्यवाहीसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळेच्या सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता; परंतु त्या ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच सरपंच रांगणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आलेली नाही.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गट भाजप व शिंदे गट यांच्यामध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये थेट सरपंच निवडणुकीत शिंदे गटाच्या रांगणकर या बहुमताने निवडून आल्या होत्या. सात सदस्यांमध्ये एक सदस्य भाजप व सहा शिंदे गट निवडून आले. या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून प्रसाद सुनील तोडणकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. दोन वर्षे व्यवस्थित कारभार चालू असतानाच सरपंच रांगणकर यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचा कारभार केला जात असल्याचा आक्षेप सदस्यांकडून घेण्यास सुरुवात झाली. सरपंचांच्या काही निर्णयामुळे गावामध्ये अनेक अडीअडचणी निर्माण होत असल्याचे सदस्यांचे मत होते तसेच निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याचीही नाराजी सदस्यांनी व्यक्त केली आहे. सरपंचांच्या मनमानी कारभाराविरोधात अखेर सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव तहसीलदारांना सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांनी सरपंचांच्या विरुद्ध असलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या दाखल ३० जूनला सुनावणीचे आदेश देण्यात आले; परंतु २५ जूनलाच सरपंच रांगणकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला. त्यानंतर २ जुलैला विशेष मासिक सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात हा राजीनामा सादर करण्यात आला. या राजीनाम्याला सात ग्रामपंचायत सदस्यांनी मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.
---------
कोट
थेट सरपंच निवडणुकीत गावाच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने एकमताने ग्रामपंचायतीचा कारभार करता यावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांना बहुमताने निवडून दिले होते; परंतु ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केल्यामुळे पाच वर्षासाठी निवडून दिलेले असतानाही अडीच वर्षातच अविश्वासाचा ठराव दाखल करण्याची वेळ आली.

- प्रसाद तोडणकर, उपसरपंच, गणेशगुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com