कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले
फोटो : kan32.jpg
75080
वरवडे ः येथील आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती.
फोटो ः kan33.jpg
75081
कणकवलीः येथील गडनदीपात्रात पूरसदृश्य स्थिती होती.
कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले
आचरा, हळवल, बोर्डवे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ः दोन दिवस कोसळत असलेल्या धुवांधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. गडनदीचे पाणी रस्त्यावर आल्याने आचरा, हळवल, बोर्डवे, कळसूली या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्रभर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.
कणकवली शहर आणि तालुक्यात काल (ता.२) दिवसभर अतिमुसळधार पाऊस झाला. तसेच रात्र आणि आज सकाळच्या सत्रातही पावसाच्या सरी बरसल्या. यात गडनदी पात्रात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. परिणामी ठिकठिकाणच्या रस्त्यावर पाणी येऊन वाहतुकीसाठी मार्ग ठप्प झाले होते. कणकवली आचरा मार्गावर सेंट उर्सुला स्कूल, रामगड, गोठणे, श्रावण आणि बेळणे या मार्गावर पाणी आल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली होती. तर बोर्डवे येथे पाणी आल्याने रात्रवस्तीची कळसुली-कणकवली ही बस बोर्डवे येथे अडकून पडली होती. याखेरीज असगणी मार्गावर बागायत येथे तर कणकवली शिवडाव मार्गावर भाकरवाडी आणि परबवाडी येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळी ११ वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. यात कणकवली-आचरा मार्गाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. तर वरवडे येथे पाणी कायम असल्याने कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक बिडवाडी मार्गे वळविण्यात आली होती.
दरम्यान गडनदीपात्राच्या तुलनेत जानवली नदीपात्रात पूरस्थिती नव्हती. त्यामुळे तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात होती. तर दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे सायंकाळी जनजीवन पूर्ववत झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.