शास्त्री पूल ते ओझरखोल दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य

शास्त्री पूल ते ओझरखोल दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य

Published on

‘शास्त्रीपूल ते ओझरखोल’ मार्गावर खड्डे
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः संगमेश्वर शास्त्रीपूल ते ओझरखोलदरम्यानच्या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या खड्ड्यांमध्ये तात्पुरती खडी टाकून त्यांना बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी ही उपाययोजना अपुरी ठरत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
महामार्गावरील खड्डे व दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा रस्ता सध्या अतिशय धोकादायक ठरत आहे. पावसामुळे डोंगरउतारांवरील माती व खडक रस्त्यावर कोसळत आहेत. त्यामुळे प्रवास अधिकच धोकादायक बनत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार खड्डे भरताना योग्य ती सुरक्षाव्यवस्था ठेवली जात नाही. अपुऱ्या कामामुळे खड्डे भरले तरी काही दिवसांतच पुन्हा तयार होतात आणि वाहनचालकांना त्याचा फटका बसतो. प्रशासनाने या मार्गावर कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच दरडी कोसळण्याच्या संभाव्य भागांवर योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा अजूनही अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com