दिंडी

दिंडी

Published on

-rat५p१५.jpg-
२५N७५४६०
सावर्डे : धार्मिक सलोखा दिंडीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी.

सावर्डे शाळेत धार्मिक सलोखा दिंडी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे ः प्राथमिक शाळा सावर्डे येथे आषाढी एकादशी व मोहरम या दोन्ही सणांचे औचित्य साधून राष्ट्रीय सलोखा दिंडी काढण्यात आली. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी विद्यार्थ्यांकडून छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकरी वेशामध्ये तसेच मुली नऊवारी साडी, डोक्यावर तुळस या वेषभूषेमध्ये आल्या होत्या. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम’ असा टाळमृदंगाच्या साथीने जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला.
मुलांच्या गजराने पंढरपूर अवतरल्यासारखे दिसत होते. मुली डोक्यावर तुळशी घेऊन नाचत होत्या तर मुलगे पालखी घेऊन नाचत होते.
-----
केवळ फोटो
ratchl५१.jpg
५N७५५१२
चिपळूण ः आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकली मुले शाळेत आली होती. कोण विठ्ठल झाले तर कोणी रूक्मिणी. कोणी टाळकऱ्यांची वेशभूषा केली. या वारकऱ्यांच्या वेशभूषेत तालुक्यातील दसपटी कळकवणे येथून सती चिंचघरी शाळेत निघालेली चिमुकले विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com