-विद्यार्थ्यांचे दिंडीने शहरातील वातावरण भक्तीमय
-rat५p१९.jpg
२५N७५४८०
मंडणगड: दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केल्या होत्या.
---
दिंडीने शहरातील वातावरण भक्तिमय
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः आषाढीवारीमुळे राज्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण झालेले असताना ५ जून रोजी शहरातील नूतन विद्यामंदिर मंडणगड, भिंगळोली जि. प. शाळा, राजीव गांधी इंग्लिश स्कूल, पालांडे नर्सरी यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळांमधील विद्यार्थी विठू रखुमाई, वारकरी वेशभूषा, संतांची वेशभूषा करून दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. शहरात डॉ. बाबासाहेब हायस्कूल मंडणगड, पंचायत समिती मंडणगड, नगरपंचायत व्यापारीसंकूल व दुर्गवाडी भैरी मंदिराच्या परिसरात दिंडी काढण्यात आली. विठुरायाचा नामस्मरण करून टाळढोलकीच्या गजरात विद्यार्थ्यांनी वातावरण भारावून टाकले. अत्यानंदाने रिंगण करून फेर धरला व वारीचा प्रसंग निर्माण केला. भिंगळोली जिल्हा परिषद शाळेतही अशाचप्रकारे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.