‘जेल टूरिझम’ची संकल्पना साकारणार

‘जेल टूरिझम’ची संकल्पना साकारणार

Published on

75535


‘जेल टूरिझम’ची संकल्पना साकारणार

नीतेश राणे : केसरकरांची स्वप्ने पूर्ण करण्यास कटिबद्ध

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः जेल टूरिझम ही माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची संकल्पना आहे. केसरकर यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या खांद्यावर ही जबाबदारी दिली आहे. एका विचाराने काम करणारे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे ऑडिट रिपोर्टनंतर पुढील १०० वर्षे टिकेल असे काम करू. पर्यटक देखील इथे येतील, यासाठीच नियोजन करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आरोंदा येथील बेघर होणाऱ्या मच्छीमार बांधवांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘आरोंदा येथील मच्छीमारांसंदर्भात मी संबंधित तहसीलदार, मत्स्य आयुक्तांशी बोललो आहे. नियमात राहून जी मदत करता येईल, ती आम्ही करणार आहोत. यासंदर्भात सगळी माहिती घेतली आहे. सिंधुदुर्गात आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. एखाद्याने आयुष्य संपविणे हे फारच क्लेशदायक आहे. अमली पदार्थांचा वापर कमी व्हावा. सामाजिक संतुलन राहावे, सोशल मीडियाचा होणारा अधिक वापर, यावर प्रशासन म्हणून बारकाईने लक्ष ठेवून आहोत. स्वतःचे आयुष्य कोणी संपवू नये, हीच अपेक्षा आहे.’ यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आदी उपस्थित होते.
---
‘झीरो पॉईंट, मळगावबाबत बोललो ते खरे’
शक्तिपीठ महामार्गाबाबत पालकमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्याचा पालकमंत्री आणि सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आम्हाला निर्देश देतात, त्यानुसारच आम्ही बोलतो. स्वतःचे डोके लावत नाही. त्यामुळे झीरो पॉईंट किंवा मळगावबाबत जे बोललो ते खरे समजावे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com