जिल्हा सहकारी बोर्ड संचालकपदी टेरवकर

जिल्हा सहकारी बोर्ड संचालकपदी टेरवकर

Published on

जिल्हा सहकारी बोर्ड संचालकपदी टेरवकर
चिपळूण : संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक सुनील टेरवकर यांची रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डावर सलग दुसऱ्या पंचवार्षिक कार्यकाळासाठी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. गेली दोन दशके टेरवकर विविध सहकारी संस्थांत कार्यरत असून, त्यांनी शिरळ गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तसेच रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ लि. येथील तज्‍ज्ञ संचालक म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे.

मारळ येथे विद्यार्थ्यांनी लुटला वारीचा आनंद
साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे केंद्रशाळा येथे आषाढी एकादशीनिमित्त मुलांनी दिंडी काढून वारीचा आनंद लुटला. पारंपरिक पोषाखात मुलांनी पालखीसह दिंडी काढली. या दिंडीत मुलांनी हरिनामाचा गजर केला. सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन भजन सादर केले. शिक्षकांसह ग्रामस्थही या कौतुक सोहळ्यात सामिल झाले होते. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक नरेश सावंत, सावंत, पद्माकर हर्डीकर, संजय पंदेरे, वेदिका कदम, मीताली कामतेकर, गार्गी सावंत, चिन्मय पांचाळ, मानवी सप्तीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील सरफरे, अंगणवाडी सेविका सावंत आदी उपस्थित होते.

सोनवडे विद्यालयात पारितोषिक वितरण
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाला प्रा. डॉ. हेमंत चव्हाण, प्रभाकर सनगरे, मोहन दर्डे, अभिमन्यू शिंदे, अनिल नांदळजकर आदी उपस्थित होते. दहावीत प्रथम आलेली सुप्रिया संसारे, द्वितीय पार्थ पांचाळ, तृतीय श्रावणी जोशी आणि प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच पाचवी ते नववीत पहिल्या तीन विद्यार्थ्यांसह गरजू, हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी देणगी स्वरूपात ठेवलेल्या निधीतून रोख रक्कम देण्यात आली. आदर्श विद्यार्थी वेदांत पांचाळ तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार निधी जाधव यांना शिल्ड व रोख रक्कम देण्यात आली. पुस्तक परीक्षण स्पर्धेतील छोट्या गटातील विजेते श्रुतिका संसारे, अस्मी मेंगाल व आदित्य मोहिते यांना तर मोठ्या गटातील तेजल पांचाळ, निधी जाधव व मधुरा शिंदे या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

पंचनदी शाळेत निवडणूक कार्यक्रम
दापोली : दापोली तालुक्यातील पंचनदी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम घेऊन योग्य प्रशिक्षण देण्यात आले. शाळेत मुलांचे मंत्रिमंडळ निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले. अर्ज भरणे, प्रचार करणे, रांगेतून आत येऊन पहिल्या टेबलवर ओळख, दुसऱ्या टेबलवर शाई लावून सही घेणे, तिसऱ्या टेबलवर मोबाईलवर बॅलेट देणे व मग मतदान कक्षात जाऊन मत देणे, अशी सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली. मुख्यमंत्रिपदी अर्णव म्हातले, उपमुख्यमंत्री दुर्वा मयेकर, आरोग्यमंत्री श्रेयस घर्वे, शिक्षणमंत्री श्रावणी सुखसे, स्वच्छतामंत्री निकष येलवे, शिस्तमंत्री संभव करदेकर, आहारमंत्री श्रेयस करंजे, पर्यावरण मंत्री स्वामीराज सुखसे, सांस्कृतिक मंत्री निधी महाडिक, क्रीडामंत्री श्रवण करंजे अशा १० मंत्रिपदांची नेमणूक करण्यात आली.

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
चिपळूण : चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण विद्यार्थ्यांना मुंबईचा चित्पावन संघ आणि पुण्याचा महाराष्ट्र चित्पावन संघ यांच्यातर्फे शिक्षणासाठी अर्थसाहाय्य केले जाते. ज्यांना हे सहकार्य आवश्यक असेल अशा चिपळूण आणि परिसरातील कोकणस्थ ब्राह्मण विद्यार्थी आणि पालकांनी चिपळूणच्या ब्राह्मण सहायक संघांशी ७ ते १५ जुलैपर्यंत संपर्क करावा. गरजू विद्यार्थी आणि पालक यांनी ब्राह्मण साहाय्यक संघ चिपळूण, श्रीदेव वीरेश्वर मंदिर परिसर येथे सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com