करिअरसाठी इंग्रजी भाषाही महत्त्वाची

करिअरसाठी इंग्रजी भाषाही महत्त्वाची

Published on

77073

करिअरसाठी इंग्रजी भाषाही महत्त्वाची

मुश्ताक शेख; कुडाळ उर्दू शाळेत ‘सेमी इंग्लिश’चा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारलीच पाहिजेत. मराठी, हिंदी भाषांसह इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे. आजपासून सुरू झालेल्या सेमी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन स्पर्धात्मक युगांना सामोरे जावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समितीचे अध्यक्ष, उद्योजक मुश्ताक शेख यांनी मज्जिद मोहल्ला कुडाळ येथे उद्‍घाटनप्रसंगी केले.
कुडाळ रेल्वे स्थानकानजीक फातिमाबी मेमोरियल संचलित फातिमाबी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा येथे सेमी इंग्लिश स्कूलचा प्रारंभ शेख यांच्या हस्ते झाला. यावेळी फातिबाबी ट्रस्टचे अब्दुल शेख, हमीद शेख, समद शेख, मुख्याध्यापिका सारा शेख, कारी मोअज्जम, मेहबुबी दर्जी, सलमा शेख, अब्दुलसमद शेख, मेहबूब शेख, रज्जाक शेख, लालबी ससाबाल, मुतुर्जा मुजावर, रसुला बंडेबुरुज, सैफनसाब हवालदार, रहमतबी शेख, सुलेमान शेख, मिस्बा सालोडगी, शिक्षक रहेमतबी शेख, अनिमा शेख, आफरीन शेख आदी उपस्थित होते.
श्री. शेख म्हणाले, ‘‘शाळेचा विस्तार पाहता शिक्षणासह क्रीडा व इतर सर्व क्षेत्रांत शाळेने यशाची कमान कायम उंचावत ठेवली आहे. ट्रस्टचे हमीद शेख व परिवाराने शैक्षणिक संकुलासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना नवनवीन गोष्टी आत्मसात करणे काळाची गरज आहे.’’ हमीद शेख यांनी, या प्रशालेचा गुणवंत विद्यार्थी शहाबुद्धीन शेख याला सिव्हिल इंजिनिअर बनविण्यासाठी भंगार विकून त्याच्या आई-वडिलांनी या पदापर्यंत त्याला पोहोचविले, ही बाब प्रेरणादायी आहे, असे सांगितले. त्याची आई समीरा शेख यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या समीना सलोडगी, यास्मिन मल्लिक, समीना शेख, बिस्मिल्ला गपसाडगी, शबाना रमणे, समीर शेख, जावेद हवालदार या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. शासनाच्या माध्यमातून दहा शाळांमध्ये एकमेव या उर्दू शाळेला ‘एआय’ मान्यता मिळाली. ‘एआय’च्या माध्यमातून प्रगती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी दाखविले. आफरीन शेख यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com